Raj Thackeray Meet Devendra Fadnavis : फडणवीसांच्या भेटीनंतर 'ठाकरी बाणा' कायम; अर्बन नक्षल अन् गौतम अदानी, ट्रॅफिकचा विषय छेडत राज ठाकरेंनी धु धू धुतले!

Mumbai Traffic Issues Raj Thackeray : राज ठाकरेंनी सर्व चर्चांना पूर्णविराम लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची का भेट घेतली हे स्पष्ट केले. तसेच मुंबईच्या ट्रॅफिक समस्येवरील आराखड्यावर भाष्य केले.
Raj Thackeray Devendra Fadnavis
Raj Thackeray Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. काल (बुधवारी) बेस्टचा निकाल लागला. त्यामध्ये ठाकरे बंधुंच्या युतीला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे या भेटीची राजकीय चर्चा सुरू होती. मात्र, राज ठाकरेंनी स्वतः या भेटी मागचे कारण सांगितले. तसेच सरकारवर टीका केली.

राज ठाकरे म्हणाले, टाऊन प्लॅनिंगसाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वाहतुकीच्या समस्येबाबत मी त्यांना छोटासा आरखडा दिला. गेले काही महिने मुख्यमंत्र्यांशी महत्त्वाच्या विषयांवर बोलत होतो.त्यांच्याशी टाऊन प्लॅनिंगसंदर्भात काही महत्वाच्या मुद्यावर चर्चा केली. शहरातील पार्किंग समस्या कशी सोडवता येईल या संदर्भात आराखडा दिला.

पार्किंग समस्या कशी सोडवता येईल हे सांगताना राज ठाकरे म्हणाले, 'ज्यांना गाड्याची लायसन्स देताय त्यांना शिकवलं जात नाही कुठे गाडी पार्क करायची, कसं वागायचं. त्यांना कुठल्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची भीती नाही. नको तेथे भीती दाखवतात, अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा. इथे गरजेचे आहे.' असा टोला राज ठाकरेंनी सरकारला लगावला.

'ज्या प्रकारे जमिनी गौतम अदानीच्या घशात घातल्या जात आहेत. काय होणार आहे त्या धरावीमध्ये मला सांगा? कुठेचे रस्ते होणार आहेत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray Devendra Fadnavis
Vice President Election : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 'मविआ'चे नेते मॅनेज होणार? फडणवीसांनी हाती घेतली सूत्र

'रोज या शहरात माणसं आदळ आहेत मात्र रस्ते मोठे होत नाहीत इमारती होतायेत. माणसं येणारी थांबवली पाहिजेत. बाहेरच्या राज्यातील शहर डेव्हलट करणं गरजेचं आहे. समस्यांकडे कोणाचेही लक्ष नाही. लोकांना गाड्या पार्क करण्यासाठी पार्किंग लाॅट उभे करायला पाहिजेत. या प्रकारची शिस्त लावणे गरजेचे आहे. बाहेरच्या राज्यातून लोक आले आहेत. त्यांना माहितीच नाही की या शहरात काय प्रकारची पार्किंग आहे. त्या दृष्टिकोनातून मी ट्रॅफिकचा आराखडा मुख्यमंत्र्यांना दिला.'

Raj Thackeray Devendra Fadnavis
Fadnavis reaction on Raj and Uddhav Thackeray Meet : ''राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले असतील, अन् त्यांच्यात...''; मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com