EC Press Conference : राज-उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप, निवडणूक आयोगाची तातडीने खुलासा केला; '...तर गुन्हा दाखल करू'

 Raj Thackeray Uddhav Thackeray Ink Issue : दोन टक्के ईव्हीएम खराब असल्याची कबुली निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांनी देत राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

BMC Election : मुंबई महापालिकेसह राज्यभरातील 28 महापालिकांमध्ये मतदान पार पडत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर राज ठाकरे यांनी गंभीर आरोप करत जी शाई मतदारांना लावली जात आहे. ती पुसली जात आहे. यातून पुन्हा मतदान करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शाई पुसली जात असल्याचा आरोप केला.

या आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तातडीने पत्रकार परिषद घेत खुलासा करण्यात आला आहे. जो मार्कर आणि शाई वापरली जात आहे. ती यापूर्वी देखील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हीच शाई वापरली होती. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत.

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Election Officer : 'बायको असली म्हणून काय झालं', निवडणूक अधिकाऱ्याने थेट पत्नीच्याच नावाने काढली नोटीस, वाचा नेमकं काय घडलं

मतदानच्याआधी अनेक ठिकाणी ईव्हीएम खराब असल्याचे अथवा तांत्रिक बिघाड असल्याने मतदान वेळेत सुरू झाले नाही. त्यावर बोलताना निवडणूक अधिकारी वाघमारे यांनी कबुली दिली की, दोन टक्के ईव्हीएम खराब आहे.

...तर गुन्हा दाखल करू

निवडणूक मुख्य अधिकारी दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, 'मतदानावेळी शाई लावल्यानंतर तीला ड्राय होण्यासाठी थोडा वेळ लागतो. जर त्याआधी मतदार ती पुसून टाकत असतील तर आम्ही त्यांच्यावर देखील कारवाई करू. जे व्हिडिओ फिरत आहेत त्यात शाई काढल्याचे दिसत आहेत. त्या व्हिडिओची चौकशी करू अन् फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करू.'

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Corporation Voting : सोलापुरात चक्क निवडणूक अधिकाऱ्यानेच BJPला केले मतदान; अनेक EVM मध्ये बिघाड, बोगस मतदानाचे प्रकार उघड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com