Rajya Sabha Election : एकनाथ शिंदेंची माघार, दुसरा उमेदवार नाहीच; शरद पवारांच्या उमेदवारीने चित्र पालटले!

Eknath Shinde Sharad Pawar : महायुतीमधील उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत. मात्र, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराची अजुनही घोषणा झालेली नाही. शिंदे दोन उमेदवार देण्याच्या चर्चा आहेत. मात्र, शरद पवारांच्या उमेदवारीने सगळे गणित बदलले आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : राज्यसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, एकनाथ शिंदेंकडून अजूनही उमदेवार कोण हे स्पष्ट झालेले नाही. ज्योती वाघमारे या विधीमंडळात दाखल झाल्याने त्याच उमेदवार असतील हे पक्के झाले आहे.

एकनाथ शिंदे ऐनवेळी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. राहुल शेवाळे, ज्योती वाघमारे, शायना एन सी यांच्या नावाची चर्चा उमेदवारीसाठी आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडे अतिरिक्त 20 मते आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 अतिरिक्त मते आहेत. उमेदवार विजयी होण्यासाठी 37 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेला फोडून शरद पवारांना धक्का देतील, अशी चर्चा होती.

शिंदेंनी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यास ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या उमेदवारीमुळे एकनाथ शिंदे हे दुसरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार नसल्याचे समजते. भाजपने देखील आपल्या उमेदवारांना पाठींबा देत शिंदेंच्या दुसऱ्या उमेदवारासाठी ताकद लावण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे केवळ एकच उमेदवार देतील आणि ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा आहे.

CM Eknath Shinde
Bihar CM : नितीश कुमार राज्यसभेवर जाणार! भाजपची मोठी खेळी? आता बिहारचा मुख्यमंत्रीपदासाठी 'ही' नावं चर्चेत

उमेदवारीबाबत सस्पेन्स

समाजमाध्यमांवर ज्योती वाघमारे यांना उमेदवारी मिळल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेनेकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राहुल शेवाळे, शायना एन सी, आनंदराव अडसूळ, गजानन किर्तीकर, संजय मंडलीक असे अनेक नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे नाव घोषित करून गोंधळ होण्यापेक्षा थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणनीती शिवसेनेच्या नेत्यांकडून आखण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम होता. ज्योती वाघमारे या विधीमंडळात दाखल होताच त्याच उमेदवार असतील हे पक्के झाले.

CM Eknath Shinde
Baramati NCP Politics : बारामती मधील 'या' संस्थेला अजितदादांचे नाव देण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा विरोध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com