Ramdas Kadam News: एकाच वर्षात मंत्री योगेश कदमांची तीन मोठी प्रकरणं,आता घायवळ प्रकरणात 'बाप' पुन्हा मैदानात; सरकारलाच अडचणीत आणणारा दावा

Nilesh Ghaiwal brother gun license : महायुती सरकार सत्तेत येऊन काही महिनेच झाले असताना सरकारमधील अनेक मंत्री अडचणीत आले. त्यात धनंजय मुंडे,माणिकराव कोकाटे,संजय शिरसाट आणि योगेश कदम यांची नावं सर्वात पुढं आहेत. एकाच वर्षात तीन मोठ्या प्रकरणांनी एकाच वर्षांत गृहराज्यमंत्री योगेश कदम हे अनेकदा अडचणीत आले.
ramdas kadam devendra fadnavis yogesh kadam
ramdas kadam devendra fadnavis yogesh kadamsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महायुती सरकार सत्तेत येऊन काही महिनेच झाले असताना सरकारमधील अनेक मंत्री अडचणीत आले. त्यात धनंजय मुंडे,माणिकराव कोकाटे,संजय शिरसाट आणि योगेश कदम यांची नावं सर्वात पुढं आहेत. त्यातही एकाच वर्षात स्वारगेट बलात्कार, सावली डान्सबार आणि आता कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला पोलिसांनी अर्ज फेटाळल्यानंतरही दिलेला शस्त्रपरवाना, या तीन मोठ्या प्रकरणांनी एकाच वर्षांत गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) हे अनेकदा अडचणीत आले.

एवढंच नव्हेतर महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आणि माणिकराव कोकाटेंच्या उचलबांगडीनंतर पुन्हा दोन मंत्र्यांची नावं राजीनाम्यासाठी घेतली होती. त्यात एक नाव योगेश कदम आणि दुसरं नाव संजय शिरसाट यांचं होतं. पण या अडचणीच्या काळातच कदमांना नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठबळ दिलं. तसेच वडील रामदास कदम यांनीही त्यांच्यासाठी खंबीरपणे बाजू लढवल्याचं दिसून आलं. मुलगा जेव्हा जेव्हा अडचणीत आला, तेव्हा माजी मंत्री रामदास कदम यांनी त्याची ढाल होत विरोधकांवर तुटुन पडत त्यांनी मुलाला संकटातून बाहेर काढले.

माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.त्यांनी शिवसेना दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतरच्या घडामोडींवर गंभीर आरोप करत महाराष्ट्राचं राजकारण तापवलं होतं. अशातच कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना परवानगी दिल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. या प्रकरणी अडचणीत आल्यानंतर आणि महायुती सरकारमध्ये एकट्या पडलेल्या मंत्री आणि मुलगा योगेश कदमांच्या मदतीला आता पुन्हा एकदा रामदास भाईंनी धाव घेतली आहे.

निलेश घायवळच्या भावाला शस्त्रपरवाना देण्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर शा‍ब्दिक हल्ला चढवत सरकारची मोठी कोंडी केली आहे.याचवेळी योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणीही परब यांनी केली आहे.शिवसेनेचे फायरब्रँड नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी घायवळ शस्त्रपरवाना प्रकरणात उडी घेतल्यानंतर पहिलाच धक्कादायक खुलासा केला आहे.

ramdas kadam devendra fadnavis yogesh kadam
Shivsena News : उद्धव ठाकरेंच्या मोर्चाआधीच एकनाथ शिंदेंचा दौरा; छत्रपती संभाजीनगरमध्ये गटप्रमुखांचा घेणार मेळावा!

सचिन घायवळला शस्त्रपरवाना मंजुरी संबंधी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी (ता.9) मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, घायवळला शस्त्रपरवाना देण्यासाठी एक बड्या नेत्यानं दबाव टाकला होता. त्यांच्या सांगण्यावरूनच हा शस्त्रपरवाना दिला असल्याचा धक्कादायक खुलासा करत कदम यांनी खळबळ उडवून दिलं आहे.मात्र,त्यांनी त्या बड्या नेत्याचं नाव सांगण्यास नकार दिला.

कदम म्हणाले, मी आज कुणाचेही नाव घेणार नाही.पण गृहराज्यमंत्र्याच्या कारभारात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. त्याची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. बड्या नेत्यांनं शिफारस केल्याची बाब आपण फडणवीसांच्या कानावर घातली होती, असंही कदम यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

ramdas kadam devendra fadnavis yogesh kadam
Harshvardhan Sapkal : फडणवीस डमरु वाजवणारे गारुडी, महाजन पिस्तुल्या ; कॉंग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची टीका

महायुती सरकारमधील मंत्री योगेश कदम हे विरोधकांच्या गंभीर आरोपांनी घायाळ झाले आहेत.एकापाठोपाठ एक अशा आरोपांनी योगेश कदमांच्या अडचणी दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर योगेश कदम यांचे वडील आणि शिवसेनेचे फायरब्रँड नेते रामदास कदम यांनी आपली भात्यातून बाण काढत विरोधकांवर डागण्यास सुरूवात केली आहे.यावेळी त्यांनी सरकारलाच अडचणीत आणणारा दावा केला आहे.

योगेश कदमांना अडचणीत आणणारी प्रकरणं

1) 'ज्यावेळी स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार होत होते, त्यावेळी त्या तरुणीने आरडाओरड केला नाही. विरोध ही केला नाही. त्यामुळे आरोपीला गुन्हा करता आला', असे वादग्रस्त वक्तव्य कदम यांनी केले होते. यानंतर त्यांच्या राजीनाम्याची ही मागणी विरोधकांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनीही त्यांचे कान टोचत विधान करताना काळजी घ्या असा सल्ला दिला होता. अशा संवेदनशील प्रकरणात जपून बोला असंही ते म्हणाले होते.

ramdas kadam devendra fadnavis yogesh kadam
Modi-Fadnavis News: मोदी-फडणवीसांनी 'दि.बा. पाटील' नावासाठीचा मुहूर्त शोधलाय... पण कधी होऊ शकते घोषणा? वाचा नेमकं प्लॅनिंग

2) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी पावसाळी अधिवेशनातच कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली, त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला.त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.आजच्या आज गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com