
Panchganga river pollution News : महालक्ष्मीच्या आशीर्वादाशिवाय कोणतही काम करू शकत नाही. माझ्याकडे आलेले खाते हे या सृष्टीला वाचवण्यासाठी योगदान देणारे आहे. गेल्या वेळेस मी आले होते, त्यावेळी येथे पूर आला होता. पर्यावरण खात्याच्या माध्यमातून येथे पूर कसा येणार नाही ? यासंदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत. याशिवाय प्रदूषण मुक्त नदी अंतर्गत पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी कोल्हापूर येथील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी साखरशाळा संदर्भात मी अद्याप आढावा घेतला नाही. मात्र, ऊसतोड कामगारांसोबत त्यांची मुल जात नाहीत गावातच राहतात. त्यांची तिथं राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. मी मराठवाड्यात झालेल्या सर्वेक्षण अद्याप पाहिलेला नाही, ते कितपत खरं आहे हे मी आता पाहिलेला नाही. मात्र, सरकारी शाळांचं शिक्षण सुधारण्यासाठी त्याच्या खात्याकडून योगदान झाले तर चांगलं होईल. शिक्षण पद्धतीमध्ये आणखी बदल करण्यात येतील, असेही पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) स्पष्ट केले.
मुंबई, पुणे मेट्रोसिटी आहेत आणि येथे प्रदूषण वाढलेले आहे याचे अनेक कारण आहेत. या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत. त्यामुळे हे काही क्षणासाठी प्रदूषण असेल. यामध्ये मी स्वतः लक्ष घालणार आहे. त्याशिवाय अनेक कारखान्यांकडून प्रदूषण होत आहे, याकडे मी लक्ष देणार असल्याचे भाजप (bjp) नेत्या मुंडे यांनी स्पष्ट केले.
मी महालक्ष्मीच्या दारात आहे, मी कुठेही असले तरी मी खोटे बोलणार नाही. यासंदर्भात यासाठी एसआयटी लावण्यासाठी सर्वात आधी मी मागणी केली आहे. या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते स्वतः जातीने लक्ष घालून न्याय देतील.
ऊसतोड कामगारांची पोरं ऊस तोडायला जातात हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे. बारामतीमध्ये मुलाचा खून, पुण्यात मुळशी पॅटर्न अद्याप सुरू आहे. कोयता गँग ऍक्टिव्ह आहे, यामध्ये कोणतेही राजकारण न करता सामान्य माणसाला न्याय देतील अशी भूमिका आम्हाला घ्यायची आहे. यामुळे मजूर आणि ऊसतोड कामगारांचे उद्धार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.