Ration Card News : तुमच्याकडे चारचाकी गाडी आहे? मग रेशन दुकानातील धान्य विसरा; सरकारचा मोठा निर्णय! वाचा सविस्तर माहिती

Government decision ration card eligibility vehicle owners : चारचाकी गाडी असलेल्या कुटुंबांना रेशन कार्डवरील धान्य मिळणार नाही का? सरकारच्या नवीन पात्रता नियमांबाबत सविस्तर माहिती वाचा.
ration card eligibility rule
ration card eligibility ruleSarkarnama
Published on
Updated on

who is not eligible for ration card india : केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबांना आता रेशन दुकानातून मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही. विशेषतः ज्यांच्याकडे चारचाकी वाहन, एसी किंवा कुटुंबातील कोणी आयकर भरत असेल, अशा कुटुंबांचे रेशन कार्ड रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे नवे नियम 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे देशभरातील मोठ्या संख्येने रेशन कार्डधारकांवर परिणाम होऊ शकतो. अंदाजानुसार सुमारे 70 लाख रेशन कार्डधारकांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात. सरकारकडून रेशन योजनेचा लाभ केवळ खरोखर गरजू आणि गरीब नागरिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हे कठोर निर्णय घेतले जात आहेत.

ration card eligibility rule
TET पास व्हा, अन्यथा..! सोलापूरच्या 7 हजार 400 गुरुजींना नोकरी वाचवण्यासाठी उरल्या 6 संधी, टांगती तलवार कायम!

नवीन नियमांनुसार आता सर्व रेशन कार्डधारकांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. पात्रता तपासूनच पुढे रेशनचा लाभ दिला जाणार आहे. ज्यांचे आर्थिक उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्याकडे काही विशिष्ट मालमत्ता आहे, अशांची नावे रेशन यादीतून काढली जाणार आहेत.

सरकारने शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळ्या उत्पन्न मर्यादा निश्चित केल्या आहेत. शहरी भागात वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त असल्यास त्या कुटुंबाला रेशनचा लाभ मिळणार नाही. तर ग्रामीण भागात ही मर्यादा 2 लाख निश्चित करण्यात आली आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना अपात्र घोषित केले जाणार आहे.

याशिवाय काही मालमत्ता किंवा सुविधा असलेल्या कुटुंबांनाही रेशन कार्डसाठी अपात्र ठरवले जाणार आहे. घरात चारचाकी वाहन असेल, 100 चौरस मीटरपेक्षा मोठा प्लॉट किंवा फ्लॅट असेल, स्वतःचे मोठे घर असेल, घरात एअर कंडिशनर किंवा जनरेटर असेल तर अशा कुटुंबांचे रेशन कार्ड रद्द केले जाऊ शकते. तसेच कुटुंबातील कोणी आयकर भरत असेल तरीही रेशनचा लाभ बंद होऊ शकतो.

सरकारकडून “एक देश, एक रेशन कार्ड” ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी पात्रतेचे निकष अधिक कडक करण्यात आले आहेत. या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत पोहोचावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

ration card eligibility rule
मोठी बातमी! दिव्यांग बांधवांच्या खात्यात आता थेट 15000 जमा होणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! काय आहे ही नवी योजना?

तसेच गेल्या काही दिवसांपासून रेशन कार्डधारकांचे ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू होती. अनेकांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचाही रेशनचा लाभ बंद होऊ शकतो. जर कोणी चुकीची किंवा खोटी माहिती देऊन रेशन कार्डचा लाभ घेत असल्याचे आढळले, तर अशा व्यक्तींवर कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली माहिती योग्यरित्या अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com