Ration Card Update: तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद? मोबाईलवर घरबसल्या काही मिनिटांत तपासा!

Ration Card Status Check Online: तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद, हे मोबाईलवर तपासता येऊ शकते. e-KYC आणि आधार सीडिंगची स्थिती तपासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा.
Free Ration Rule latest update
Free Ration Rule latest updateSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Ration Card: रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी गेल्यानंतर रेशन कार्ड निष्क्रिय झाल्याचे समजले, तर ऐनवेळी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमचे रेशन कार्ड सक्रिय आहे की बंद, हे आधीच तपासणे फायदेशीर ठरते. यासाठी रेशन दुकानात वारंवार जाण्याची गरज नाही. मोबाईलच्या मदतीने रेशन कार्डची माहिती तपासता येते. तसेच, आधार सीडिंग किंवा e-KYC अपूर्ण असल्यास ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक पावलेही उचलता येतात.

रेशन कार्ड निष्क्रिय होण्यामागे कोणती कारणे?

रेशन कार्ड बंद किंवा निष्क्रिय होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. कुटुंबाने सलग सहा महिने रेशन दुकानातून धान्य घेतले नसल्यास कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे, कुटुंबातील सदस्यांची e-KYC प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास किंवा आधारशी संबंधित ओळख पडताळणीत अडचण आल्यास संबंधित सदस्याच्या नोंदीवर परिणाम होऊ शकतो.

काही वेळा एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या रेशन कार्डांवर नोंदलेले असते. उदाहरणार्थ, लग्नानंतर माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही रेशन कार्डांवर नाव कायम राहिल्यास पडताळणीदरम्यान दुबार नोंद आढळू शकते. त्यामुळे संबंधित नोंदी दुरुस्त करणे आवश्यक ठरते.

मोबाईलवर रेशन कार्डची माहिती कशी तपासाल?

रेशन कार्डची माहिती पाहण्यासाठी अधिकृत डिजिटल सेवांचा वापर करता येतो. केंद्र सरकारच्या UMANG ॲपमध्ये लॉगिन करून सर्च बारमध्ये ‘Mera Ration’ किंवा ‘PDS’ असे शोधा. त्यानंतर उपलब्ध सेवांमधून महाराष्ट्र राज्य निवडा. रेशन कार्ड तपशील पाहण्याचा पर्याय उपलब्ध असल्यास त्यामध्ये कार्ड क्रमांक टाकून संबंधित माहिती तपासा.

मात्र, प्रत्येक ॲपमध्ये e-KYC पूर्ण करणे किंवा कार्ड पुन्हा सक्रिय करण्याची सुविधा उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे संबंधित पर्याय दिसत नसल्यास अधिकृत अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या पोर्टलवरून किंवा स्थानिक रेशन कार्यालयातून पुढील प्रक्रिया जाणून घ्या.

Free Ration Rule latest update
DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढला; महाराष्ट्रात DA थकबाकीसाठी 800 कोटी मंजूर; राज्यनिहाय महागाई भत्त्याचे दर पाहा

आधार लिंक आहे की नाही, हे कसे समजेल?

‘Mera Ration’ ॲपमध्ये Aadhaar Seeding हा पर्याय उपलब्ध असल्यास त्याच्या मदतीने आधार जोडणीची स्थिती तपासता येऊ शकते. रेशन कार्ड क्रमांक किंवा आवश्यक तपशील भरल्यानंतर कुटुंबातील सदस्यांची माहिती पाहा. एखाद्या सदस्याचे आधार सीडिंग पूर्ण नसल्याचे दिसल्यास संबंधित कागदपत्रांसह अधिकृत रास्त भाव दुकानात संपर्क साधा.

तेथे ePoS मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून घेता येते. आवश्यक असल्यास रेशन कार्यालयाच्या मदतीने e-KYC प्रक्रिया पूर्ण करा. पडताळणीनंतर नोंदी अद्ययावत होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो.

Free Ration Rule latest update
PM-VBRY Yojana: पहिली नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार देणार 15 हजार रुपये; कोणाला मिळणार लाभ? दुसऱ्या हप्त्यासाठी ‘हे’ काम करा

फसवणूक टाळण्यासाठी ही काळजी घ्या

e-KYC किंवा आधार सीडिंगसाठी अनधिकृत व्यक्तींना पैसे देऊ नका. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, तसेच OTP किंवा आधारशी संबंधित संवेदनशील माहिती इतरांना देणे टाळा. रेशन कार्ड बंद असल्याचे दिसल्यास त्याचे कारण अधिकृत विभागाकडून निश्चित करून घ्या. केवळ ॲपमध्ये माहिती दिसत नसल्यामुळे कार्ड कायमचे बंद झाले आहे, असा निष्कर्ष काढू नका.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com