Amravati NCU Fire : अमरावती हादरले! SNCU मधील आगीत नवजात बालकांचा मृत्यू; राणा दाम्पत्य आक्रमक, म्हणाले, 'कोणालाही सोडणार...'

Ravi Rana Navneet Rana : तीन नवजात बालकांना जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत जीव गमवावा लागला. त्यावर राणा दाम्पत्याने प्रतिक्रिया दिली आहे.
 Ravi Rana Navneet Rana
Ravi Rana Navneet Ranasarkarnama
Published on
Updated on

Amravati NCU Fire: अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नवनीत राणा म्हणाल्या की, स्प्रिंकलर का सुरू झाले नाही? सिलिंडरचा स्फोट कसा झाला? याची चौकशी होणार आहे. मी स्वतः अन् रवी राणाजी देखील मंत्रिमहोदयांशी बोलले आहेत. याची चौकशी १०० टक्के होणार आहे. निष्काळजीपणा करणाऱ्यांची खैर नाही, त्यांच्यावर कडक पद्धतीने कारवाई होईल. तीन लहान मुलांचे जीव जेव्हा जाते मी सगळ्यांना सांगेल की यात चुकीतचे अडथळे तर त्यावर कडक कारवाई करावी.

रवी राणा यांनी रुग्णालया प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले, डॉक्टर आणि व्यवस्थेचा बेफिकीरपणा आहे. सकाळी साडेतीन वाजल्यापासून डॉक्टर आणि इतर लोकांच्या संपर्कात मी आहे. तीन वर्षांपूर्वी अशीच आग लागली होती. तेव्हा जुन्या बिल्डिंगमधून नव्या इमारतीत शिफ्ट करण्यात आले. आरोग्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. फायर ऑडिट झालं नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. फायरब्रिगेडची गाडीही उशीरा पोहोचली, त्यावरही मी स्वत: कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

 Ravi Rana Navneet Rana
Amravati Hospital Fire : 3 नवजात बालकांच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला! जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट झाला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

ठाकरेंच्या शिलेदाराची टीका

आमदार अंबादास दानवे यांनी या घटनेनंतर ट्विट करत म्हटले कीस 'इन्फ्रामॅन' वगैरे ऐकायला तुम्हाला ठीक वाटत असेल; पण अमरावतीत व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन बालके होरपळून दगावली आहेत, साहेब! यात तातडीने कडक कारवाई अपेक्षित आहे, तीही बड्या माशांवर. तुमच्या आरोग्यमंत्र्यांनाही तिकडे पाठवा; महाराष्ट्राला कळू द्या की राज्यात या खात्याला कोणी मंत्री आहेत!

 Ravi Rana Navneet Rana
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या भूमिकेत मोठा बदल; म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील आमच्या विरोधात नाही...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com