Ravindra Chavan News : कुणकुण लागताच रवींद्र चव्हाण यांनी पुढचं बोलणं टाळलं...

Political News : राज्याचे माजी मंत्री आणि भाजपनेते आमदार रवींद्र चव्हाण यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Ravindra Chavan
Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

Ravindra Chavan avoids comment : विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचे कोल्हापूर दौरा वाढलेला आहे. आपल्या कुटुंबासमवेत करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेत पुढील पाच वर्षाच्या राजकीय प्रवासाला आशीर्वाद घेतले. भाजपसह शिवसेना राष्ट्रवादीतील अनेक नेते करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी लीन झाले आहेत. त्यामुळे सातत्याने नेत्यांचे दौरे सुरू आहेत. शुक्रवारी राज्याचे माजी मंत्री आणि भाजपनेते आमदार रवींद्र चव्हाण यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पण राजकीय प्रश्नांची कुणकुण लागताच त्यांनी काढता पाय घेतला.

महायुती सरकारच्या हातून जनतेची अविरतपणे सेवा व्हावी, तसेच महाराष्ट्रातील जनतेला चांगले आरोग्य लाभो. प्रलंबित कामे मार्गी लागो, महायुतीमधील सर्वच नेते एकत्रितपणे जनतेच्या कामाला मार्गी लावू यासाठी मी आज देवीचे दर्शन घेतले आहे. सर्व कामात बळ द्यावे, असे साकड मी देवीला घातले असल्याचे रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी सांगितले.

Ravindra Chavan
Santosh Deshmukh Murder Case : ‘अजितदादा बीडचं पालकमंत्री व्हा म्हणजे तुम्हाला किती अंधारात ठेवलंय ते कळेल’

मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पार्टी जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असतो. पक्ष जो जबाबदारी दिली ती देखील मी यशस्वीपणे पार पाडेन, असे सांगत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजीचा मुद्दा पत्रकार बांधवांनी विचारल्यानंतर मात्र, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथून काढता पाय घेतला.

Ravindra Chavan
Dhananjay Munde : महायुतीतील आमदारानेच घेतली मुंडेंचं राजकारण संपवण्याची सुपारी! मिटकरींना कुणावर संशय?

महायुतीमधील बंडखोर भाजप नेत्यांसोबत करवीर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून (Congress) राहुल पाटील तर शिवसेनेकडून चंद्रदीप नरके यांनी निवडणूक लढवली. महायुती म्हणून एकत्र लढत असताना जनसुराज्य शक्तीकडून उमेदवारी मिळवत बंडखोरी केलेले संताजी बाबा घोरपडे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मंदिरात दिसले. दिवसभर ते त्यांच्यासोबत दिसल्याने घटनास्थळी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

Ravindra Chavan
Manmohan Singh Political Story: पंतप्रधान, अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी घेतलेले '6' धाडसी निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com