Ravindra Dhangekar : 'महिला पोलिस विनयभंग प्रकरणी आमदार हेमंत रासनेंना सहआरोपी करा', रवींद्र धंगेकरांचा मित्रपक्षावरच हल्लाबोल

Ravindra Dhangekar Hemant Rasane Molestation Case : महिला पोलिस अधिकाऱ्याच्या विनयभंगा प्रकरणी महायुती मधील मित्र पक्षांनी देखील प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
Ravindra Dhangekar  Hemant Rasane
Ravindra Dhangekar - Hemant RasneSarkarnama
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्या दरम्यान बंदोबस्ताला असलेल्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी सोबत भाजप पदाधिकाऱ्याने गैरवर्तन केल्याचे समोर आले होते. याबाबत पुणे पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा विनयभंगाचा प्रकार जेव्हा घडला त्यावेळी भाजप आमदार हेमंत रासने हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

विनयभंग प्रकरणात भाजप पुणे शहर महामंत्री प्रमोद विठ्ठल कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सध्या राजकीय आणि पोलिसांच्या वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रमोद कोंढरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाला पाठवला असून तो पक्षातून स्वीकारण्यात देखील आला आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर सातत्याने विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे. आता महायुती मधील मित्र पक्षांनी देखील प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसमधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आलेले रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणावरून भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. आता त्यांनी या प्रकरणात हे आमदारांनाच सहआरोपी करावी अशी मागणी केली आहे.

Ravindra Dhangekar  Hemant Rasane
Devendra Fadnavis On Babanrao Lonikar : मोदीजी स्वतःला प्रधान सेवक सांगतात, आम्हीही सेवकच मालक होता येणार नाही! लोणीकरांना समज देणार!

रवींद्र धंगेकर म्हणाले, पोलिस अधिकारी विनयभंग प्रकरणात आमदार हेमंत रासने यांनाही सह आरोपी करा.भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील पदाधिकारी असलेल्या प्रमोद कोंढरे याने दोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरात एका पोलिस अधिकारी महिलेचा विनयभंग केला.. या प्रकाराचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर प्रमोद कोंढरे याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा संपूर्ण प्रकार कसल्याचे आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडला. त्याचवेळी हेमंत रासने यांनी प्रमोद कोंढरे याला समज देणे आवश्यक होते. मात्र असे काहीही घडले नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात हेमंत रासने यांना देखील सह आरोपी करण्यात यावं, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे..

Ravindra Dhangekar  Hemant Rasane
Uddhav Thackeray: भास्कर जाधवांच्या धडाडत्या तोफेचं तोंड ठाकरेंकडेच! नाराजीवर मार्ग काढण्यासाठी मातोश्रीवर आमंत्रण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com