Uddhav Thackeray: भास्कर जाधवांच्या धडाडत्या तोफेचं तोंड ठाकरेंकडेच! नाराजीवर मार्ग काढण्यासाठी मातोश्रीवर आमंत्रण

Bhaskar Jadhav News : गेल्या चार दिवसापासून भास्कर जाधव यांची नाराजी समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात भास्कर जाधव काय निर्णय घेणार ? याची उत्सुकता लागली आहे.
Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav
Uddhav Thackeray-Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News: विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड होणार का? याबाबत उत्सुकता लागली आहे.

राज्यातील महायुतीचे सरकार विरोधी पक्षनेतेपदासाठी काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले असतानाच दुसरीकडे मात्र, या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवला आहे.

दुसरीकडे गेल्या चार दिवसापासून भास्कर जाधव यांची नाराजी समोर आली आहे. त्यामुळे येत्या काळात भास्कर जाधव काय निर्णय घेणार ? याची उत्सुकता लागली आहे. मात्र, जाधव यांनी अद्याप निर्णय घेतला नसल्याने तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रमाणे उद्धव ठाकरे येत्या काळात भास्कर जाधव यांची नाराजी कशा प्रकारे दूर करणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

आठ दिवसापूर्वीच शिवसेनेचा (Shivsena) वर्धापनदिन साजरा झाला. यावेळी घणाघाती भाषण करीत भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षावर मोठा हल्लाबोल केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदार व आमदार यांची बैठक पार पडली होती.

या बैठकीला देखील भास्कर जाधव हजर होते. त्यानंतर दोन दिवसातच चिपळूणला गेल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे देखील स्पष्ट केले होते. त्यामुळे या नाराजीवर पडदा पडेल, असे वाटत होते.

Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav
Shivsena UBT-MNS Alliance : राज-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चेला ग्रहण? मनसेच्या नव्या भूमिकेमुळे एकतेवर प्रश्नचिन्ह!

त्यानंतर पुन्हा एकदा गुरुवारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी स्टेट्स ठेवत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच जाधव यांनी ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटसची सुद्धा चर्चा होत आहे. दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते...विझल्यानंतर टाकलेल्या तेलाला अर्थ नाही. माणसाची तसंच....वेळेत किंमत केली नाही तर नंतर पश्चाताप करून काय अर्थ?

असंही भास्कर जाधव स्टेटसद्वारे म्हणाले. नाराजीच्या चर्चांना पूर्ण विराम दिल्यानंतर चोवीस तासांच्या आत भास्कर जाधवांनी व्हॉट्सॲप वर दोन वेगळ्या अर्थाचे पोस्ट शेअर केल्यामुळे राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली आहे. पक्षातील पहिल्या फळीच्या नेत्यांविषयी भास्कर जाधवांची नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे.

Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav
Babanrao Lonikar Controversy Statement : जीभ घसरलेल्या बबनराव लोणीकरांवर सुषमा अंधारेंचा प्रहार; म्हणाल्या, 'लाचार...'

भास्कर जाधव नाराज आहेत का? त्यांची नेमकी भूमिका काय आहे ? हे जरी ते माध्यमांसमोर येऊन स्पष्ट करत असले तरी उद्धव ठाकरे यांची या सगळ्या संदर्भात ते भेट घेणार असल्याची माहिती आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कधी कधी आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते. शिवाय आपल्याला काम करण्याची संधी कमी मिळते, याचे कारण आपण हुजूरी करत नसल्याचे काही दिवसापूर्वी त्यांनी स्पष्ट केले होते.

Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav
Ambadas Danve News : महाराष्ट्रातील अंदाज समितीच संशयाच्या घेऱ्यात! अंबादास दानवेंनी टायमिंग साधले

जाधव यांच्याकडे विदर्भातील संघटनात्मक जबाबदारी आहे. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी होती. पण तिथल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले हे मला सांगण्यात आलं नाही. ते कोणी दिले? कसे दिले? याची माझ्याकडे काहीच माहिती नव्हती.

ज्या भागाची जबाबदारी आहे तिथल्या गोष्टी मला समजायला हव्यात, असे जाधव यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या सर्व नाराजीवर उद्धव ठाकरे कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Politics : नाराज नाही म्हणणारे भास्कर जाधवांच्या व्हाॅट्सअप स्टेट्सने खळबळ, इशारा की संकेत?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी भास्कर जाधव हे चर्चा करणार आहेत. त्यावेळी जाधव यांचं म्हणणं जाणून घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षावर नाराजी व्यक्त केली.

जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांच्या बैठकीत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. जाधव यांनी पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे या बैठकीत उद्धव ठाकरे काय मार्ग काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav VS Sanjay Raut : भास्कर जाधवांच्या नाराजीवर संजय राऊतांची सारवासारव; म्हणाले, 'मनात वेदना...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com