Rohit Gavit Custody : पालघर रुग्णालय राडा : आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी

Palghar Hospital Assault Case : रोहित गावितला पोलिसांनी शुक्रवारी मीरा रोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पालघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
Rohit Gavit Custody
Rohit Gavit Custodysarkarnama
Published on
Updated on

निखिल मेस्त्री

Palghar News : पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणात आमदारपुत्र रोहित राजेंद्र गावित याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी मीरा रोड येथून ताब्यात घेतलेल्या रोहितला शनिवारी पालघरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. चाळकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर रोहितला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या कारवाईमुळे रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणातील अटकांची संख्या आता १४ वर पोहोचली असून, सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

रोहित गावितला पोलिसांनी शुक्रवारी मीरा रोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पालघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. येथे स्टेशन डायरी नोंद, अटक नोंद, वैद्यकीय तपासणी, हाताचे ठसे आदी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शनिवारी सकाळी त्याला पालघर न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयात सुनावणीदरम्यान रोहित गावितच्या वतीने तसेच सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

Rohit Gavit Custody
Palghar Case : शिवसेना 'आमदार पुत्रा'ला पोलिसांची मदत? न्यायालयाने ओढले ताशेरे; 'कारवाई हास्यास्पद, घटनेतील सलाईन कुठे गेले?'

दहीहंडीच्या दिवशी रुग्णालयात नेमके काय घडले?

दहीहंडीच्या दिवशी पालघर येथील रिलीफ रुग्णालयात गोविंदा पथकातील सदस्यांच्या उपचारावरून गोंधळ झाल्याचा आरोप आहे. या वेळी रुग्णालयात घुसून डॉक्टरांना शिवीगाळ व अर्वाच्य भाषा वापरणे, तसेच रुग्णालयातील कर्मचारी विवेक झिंगा यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप पोलिसांच्या तपासात समोर आला आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीवरून पालघर पोलीस ठाण्यात शिवसेना पदाधिकारी कुंदन संखे, साईराज पाटील, राहुल घरत, विकी संखे, शुभम बांदिवडेकर, ऋषभ वारे, तसेच नगरसेवक नीलम संखे, मनोज घरत आणि अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली. शिवसेनेने कुंदन संखे, साईराज पाटील, राहुल घरत, विकी संखे, शुभम बांदिवडेकर आणि ऋषभ वारे यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

राहुल घरतची कोठडी कायम

या प्रकरणातील निलंबित पालघर शहरप्रमुख राहुल घरत याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयाने तीन वेळा पोलीस कोठडी सुनावली असून, सध्या तो १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे.

दरम्यान, एफआयआरमध्ये नमूद असलेल्या अनोळखी व्यक्तींचा पोलिसांनी शोध सुरू केला. तपासात या व्यक्तींचा संबंध गोविंदा पथकाशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल १२ जणांना ताब्यात घेतले. त्यांना शुक्रवारी पालघर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या बारा जणांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

दरम्यान, प्रकरणातील निलंबित पदाधिकारी साईराज पाटील, राहुल संखे आणि मनीष (विकी) संखे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी न्यायालयाने फेटाळला.

तर कुंदन संखे, शुभम बांदिवडेकर आणि नगरसेवक नीलम संखे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्यावर १५ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह

रुग्णालयातील राडा प्रकरणाची व्याप्ती वाढत असतानाच पोलिसांच्या तपासाची भूमिकाही चर्चेत आली आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जात असताना, उच्च न्यायालयानेही तपासाबाबत पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत.

त्यामुळे आता रोहित गावितच्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीत तपास कोणत्या दिशेने पुढे जातो, या प्रकरणातील इतर आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहोचतात आणि आणखी कोणावर कारवाई होते, याकडे पालघरचे लक्ष लागले आहे.

Rohit Gavit Custody
Drug Case : शिंदेंच्या नेत्यावर पोलिसांची धडक कारवाई, घरातच सापडले ड्रग्ज; माजी उपसभापतीवर गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com