Palghar Case : शिवसेना 'आमदार पुत्रा'ला पोलिसांची मदत? न्यायालयाने ओढले ताशेरे; 'कारवाई हास्यास्पद, घटनेतील सलाईन कुठे गेले?'

Palghar Hospital Attack Case : पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांना शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावितसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.
Palghar news.jpg
Palghar news.jpgSarkarnama
Published on
Updated on

Palghar Case : रुग्णालयातील मारहाणप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा फास आवळला असून, एफआयआरमध्ये नऊ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. यापैकी शिवसेनेचे निलंबित युवा सेनाप्रमुख साईराज पाटील आणि पालघरचे आमदार राजेंद्र गावीत यांचे पुत्र रोहित यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. दरम्यान, गोविंदा पथकातील १२ जणांना अटक करून न्यायालयाने त्यांना १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पण आता पालघर पोलिसांनी केलेल्या तपासावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. याप्रकरणी पालघर पोलिसांनी केलेला तपास आणि पंचनाम्यापासून नोंदवहीपर्यंतची (केस डायरी) कारवाई हास्यास्पद असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले.

रुग्णालयात कर्मचाऱ्यांना मारहाण होते, डॉक्टरांना धमकावले जाते त्याबाबत पोलिस प्रशासन गंभीर का नाही? पोलिसांनी तपासात काहीच केलेले नाही, असे निरीक्षण न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने नोंदवले.

Palghar news.jpg
Palghar Crime Case: पालघर रुग्णालय कर्मचार्‍यांना मारहाण प्रकरण: शिवसेना 'आमदार पुत्रा'ला निलंबनानंतर आता पोलिसांचा दुसरा मोठा दणका

पालघर पोलिसांनी याप्रकरणी केस डायरीत नोंद करताना दाखवलेली हलगर्जी पंचनाम्यातही कायम ठेवल्याचे खंडपीठाने निरीक्षण नोंदवले. उपचारासाठी आलेल्या गोविंदाचे सलाईन काढून त्याला जबरदस्तीने रुग्णालयातून बाहेर नेण्यात आले. या घटनेत त्याला लावलेले सलाईन कुठे गेले? ते ताब्यात का घेतले नाही? इतका महत्त्वाचा पुरावा ताब्यात घेणे तपास अधिकाऱ्याला आवश्यक वाटले नाही का? उद्या सिद्ध काय करणार, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले.

दरम्यान, सत्ताधारी घटक पक्षाशी संबंधित असल्याने आरोपीबाबतची कारवाई कूर्मगतीने सुरू असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील ए. यू. कामदार यांनी केला. संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश देण्याची केलेली मागणी मान्य करून पोलिसांना रुग्णालयाला पुढील आदेश येईपर्यंत सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले.

हीच का तुमची कार्यक्षमता?

डॉक्टर मारहाणप्रकरणी १७ जणांविरोधात पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नऊ आरोपी फरार असून एक अटकेत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे १२ निनावी व्यक्तींना गुरुवारी ताब्यात घेतले आहे, तर फरारी आरोपींपैकी तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळल्याची माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली. त्यावर हे आरोपी अद्याप फरारी आहेत का, हीच का तुमची कार्यक्षमता, अशी विचारणाही न्यायालयाने केली.

Palghar news.jpg
Palghar case : लव जिहादचा धक्का! बीडमधील दोन मुलांच्या बापानं ‘हिंदू’ बनून युवतीला फसवलं

पोलिस महानिरीक्षकांना चौकशीचे आदेश

पालघर पोलिसांनी घटना घडल्यापासून आरोपींना मदत होईल, अशी कारवाई केल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. याप्रकरणी कोकण विभागाच्या अतिरिक्त पोलिस महानिरीक्षकांना पालघर पोलिसांच्या तपासाची पाहणी करून त्यांनी याप्रकरणी केलेली कारवाई कायदेशीर आहे की नाही, याबाबत १७ सप्टेंबरला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com