Rohit Pawar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधीमंडळात अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा ही कर्जमाफीची होती. शेतकऱ्यांसाठी सरकारने कर्जमाफी जाहीर केले आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदारांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे.
सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर आमदार रोहित पवार यांनी सरकारची घोषणा फसवी असल्याची टीका केली आहे, ते म्हणाले, 30 सप्टेंबर 2025 रोजी थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची सरकारने केलेली घोषणा ही अर्धवट, शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आणि स्वतःच दिलेल्या शब्दापासून पळ काढणारी आहे.
यंदा अतिवृष्टीमुळं संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः वाहून गेल्याने यंदाही कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये सरसकट समावेश करणं गरजेचं आहे, असे देखील ते म्हणाले. तसेच सरसकट कर्जमाफी करण्यास सरकारला भाग पाडू, असे देखील सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांनी सरकारची घोषणा फसवी असल्याची टीका केली आहे. तसेच सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, असे म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, मविआ सरकारच्या काळात दोन लाखांची कर्जमाफी दिली होती. आता पाहिले असता कर्जाचा बोजा खूप वाढला असल्याचे दिसते. त्यामुळे सरसकट चार लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी होती. नियमित कर्ज भरणाऱ्यांना एक लाख रुपयापर्यंत सूट देणे आवश्यक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.