Rohit Pawar Vs Ram Shinde : 'अजितदादांनी राम शिंदेंची बोलती बंद केली...अभिनंदन', रोहित पवारांनी 'तो' व्हिडिओच दाखवला

Ajit Pawar Shut Down Ram Shinde in MIDC Debate : निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी एक दिवस आधी केवळ मतांसाठी कर्जत-जामखेडसाठी ‘खांडवी-कोंभळी’ एमआयडीसी मंजूर करुन आणल्याचं गाजर त्यांनी दाखवलं, असा टोला रोहित पवारांनी लगावला.
Ajit Pawar, Rohit Pawar and Ram Shinde
Ajit Pawar, Rohit Pawar and Ram Shindesarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार नुकतेच कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अजित पवारांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटवरून शेअर करत अजितदादांचे आभार मानत राम शिंदेंना टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अजितदादा हे परखड आणि स्पष्टवक्ते आहेत याची प्रचिती काल पुन्हा एकदा जामखेडमध्ये आली. विशेष म्हणजे अजितदादांनी काल तोंडावरच प्रा. राम शिंदे सरांची बोलती बंद केली.

'निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी एक दिवस आधी केवळ मतांसाठी कर्जत-जामखेडसाठी ‘खांडवी-कोंभळी’ एमआयडीसी मंजूर करुन आणल्याचं गाजर त्यांनी दाखवलं आणि हुजऱ्यांकडून स्वतःची पाठही थोपटून घेतली होती. पण काल जामखेडमध्ये बोलताना ‘‘कर्जत-जामखेडमध्ये MIDC आली का? नाही आली,’’ या एका वाक्यात प्रा. राम शिंदे सरांनी एमआयडीसी आणल्याच्या दाव्याचा फुगा अजितदादांनी एका क्षणात फोडला. अजितदादा आपलं खरंच मनापासून अभिनंदन! ', असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Ajit Pawar, Rohit Pawar and Ram Shinde
Devendra Fadnavis Politics: देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' कार्यक्रमाने संपत सकाळे, विनायक माळेकर यांचा करेक्ट कार्यक्रम?

...तर तुमचे उपकार विसरणार नाही

कर्जत-जामखेडकरांच्यावतीने माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की, मागच्या टर्ममध्ये पहिल्या अडीच वर्षांतच मी पाटेगाव-खंडाळा येथील एमआयडीसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन घेतली आणि केवळ मंत्र्यांची अंतिम मंजुरी बाकी आहे..त्यासाठी आम्ही सर्वांनी अनेकदा पाठपुरावाही केला, पण दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार गेलं. त्यानंतर कोणतेही प्रयत्न न करता केवळ श्रेय मिळावं म्हणून टपून बसलेल्या आणि नकारात्मक राजकीय विचारांच्या विषाणूंची लागण झालेल्या काही नेत्यांमुळं ही अंतिम मंजुरी रखडलीय. आपण स्वतः यात घालून ही एमआयडीसी मंजूर केली तर कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपले उपकार कधीही विसरणार नाही, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

अजितदादा योग्य ईलाज कराल...

अजितदादा आपण कधीही अडवाअडवीचं काम करत नाही. पण अलीकडे माझ्या मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करुन आणलेला निधी अडवण्याचा, मंजूर केलेली कामं थांबवण्याचा, कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा आणि फोडाफोडी करण्याचा व्हायरस पसरतोय. त्यावरही निष्णात राजकीय डॉक्टर म्हणून अजितदादा तुम्हीच योग्य ईलाज कराल, असा विश्वास आहे. असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar, Rohit Pawar and Ram Shinde
Sanjay Raut on Raj Thackeray : किती वेळा कपडे बदलणार? कधी हिंदू कधी बिंदू, कधी.., संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com