Rohit Pawar Vs Jaykumar Gore : सत्ता आणि पद कायम राहणार नाही, मंत्री जयकुमार गोरेंना रोहित पवारांचा इशारा

Rohit Pawar Warns Minister Jaykumar Gore : सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो हे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात दिसत आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला.
Jaykumar Gore  Rohit Pawar
Jaykumar Gore Rohit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी आणि धमकी दिल्या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केले आहे. या प्रकरणात विधान परिषदेचे माजी अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी जाऊन पोलिसांनी चौकशी केली. खंडणी मागणाऱ्या महिलेच्या संपर्कात रामराजे नाईक निंबाळकर होते, असा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

'सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो हे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात दिसत आहे. पदाचा गैरवापर करत न्याय मागणाऱ्या पिडीतेलाच जेलमध्ये टाकून आणि सत्य उजेडात आणणारे निर्भिड व खरे पत्रकार तुषार खरात यांना खोट्या गुन्ह्यात अडकवूनही या मंत्र्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाही.', असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Jaykumar Gore  Rohit Pawar
Sanjay Raut : PM मोदींशी वाद नव्हते, अमित शाह दिल्लीत आल्याने राजकीय व्यवस्थेचा...; राऊत नेमकं काय म्हणाले?

पुढे रोहित पवार म्हणाले की, 'खोट्या गुन्ह्यात अडकवूनही या मंत्र्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाही म्हणूनच विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर साहेब यांना चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.'

...तेव्हा काय अवस्था होईल

रोहित पवारांनी आपल्या ट्विटमधून थेट इशारा देत म्हटले आहे की, सत्ता ही सदासर्वकाळ नसते… आजची सत्ता उद्या जाईल त्यावेळी आपली काय अवस्था होईल, हे आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी विसरु नये.

रामराजेंच्या चौकशीवर गोरे काय म्हणाले?

माझ्या बदनामीसाठी षडयंत्र रचण्यात आले. त्यांनी नव्या नेतृत्वाला संपवण्याचे काम केले. मी मंत्रि‍पदाची शपथ घेतल्यापासून त्यांनी कळस गाठला. जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तेव्हा तो दुसऱ्यासाठी आपोआप तयार होतो. त्याच खड्ड्यात ते पडले, असा टोला जयकुमार गोरे यांनी रामराजे यांचे नाव न घेता त्यांच्या पोलिस चौकशी प्रकरणावरून लगावला.

Jaykumar Gore  Rohit Pawar
MD Drugs Crime: निवडणुका संपल्या, ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राचे काय? पुन्हा सुरू झाले एमडी ड्रग्सचे राज्यभर थैमान!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com