Sunil Tatkare : रायगडमध्ये तटकरे वादळ! शिवसेनेच्या गोटातच धडाकेबाज डाव!

political clashes between Sunil Tatkare And Bharat Gogawale, Mahendra Thorve : रायगडमध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्यातील शितयुद्धाच्या दुसऱ्या अंकास सुरूवात झाली आहे.
Sunil Tatkare And Bharat Gogawale
Sunil Tatkare And Bharat Gogawalesarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. रायगडमध्ये स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी शिवसेना विरोधकांना पक्षात ताकद दिली आहे.

  2. भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत पद दिले गेले आहे.

  3. यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शीतयुद्धाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे.

Raigad Politic's News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरेंनी आपल्या विरोधकांना घेरण्याची रणनीती आखली आहे. त्यांनी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंसह कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या नेत्यांना ताकद देत पक्षात महत्वाच्या पदावर स्थान दिले आहे. यामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना यांच्यातील शीतयुद्धाच्या दुसऱ्या अंकाला सुरूवात झाली आहे.

यापूर्वी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश तटकरे यांनी घडवून आणला. यातून गोगावले यांना मतदारसंघातच तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा केला. आता शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांनाही तटकरे यांनी राष्ट्रवादी आणले आहे. त्यातून त्यांनी माजी आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधातील प्रतिस्पर्धीच कमी केला आहे. आपल्या दोन्ही मुलांच्या भविष्यातील आमदारकी तटकरे यांनी सेफ केली आहे.

Sunil Tatkare And Bharat Gogawale
Sunil Tatkare mocks Bharat Gogawale : रायगडचं राजकारण 'नॅपकिन'वरून तापलं; तटकरेंच्या 'नक्कल'वर गोगावले बाप-लेकींनं सुनावलं...

साबळेंचा प्रभाव असलेल्या माणगावसह लोणेरे, निजामपूर, गोरेगाव, मोर्वा आणि इंदापूर हे जिल्हा परिषद गट श्रीवर्धन मतदारसंघात येतात. त्यामुळे आदिती तटकरे यांचा मतदारसंघ मजबूत झाला आहे. दुसऱ्या बाजूला 2018 मधील पराभवानंतपर विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात साबळे पुन्हा अॅक्टिव्ह झाले होते. त्यामुळे इथले माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे टेन्शन वाढले होते. पण साबळेंना पक्षाकडून पाठिंबा मिळत नव्हता. त्यामुळे ते नाराज होते. हीच नाराजी तटकरे यांनी हेरली.

गत आठवड्यात तटकरे यांनी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले. यात कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक सुधाकर घारे यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. घारे यांनाही काही दिवसांपूर्वीच तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले आहे. तर गोगावले यांचे कट्टर विरोधक महाडच्या हनुमंत जगताप यांच्याकडे प्रदेश सरचिटणिस पदाची जबाबदारी देत त्यांना ताकद देण्याचे काम केलं आहे.

घारे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून त्यांनी कर्जत मतदारसंघातून मागील विधानसभा शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना मागच्या दाराने तटकरे यांनी रसद पुरवल्याचे आजही बोलले जाते. त्यात घारे यांचा फक्त 5 हजार मतांनी पराभव झाला होता. आता थोरवे यांना खिंडीत रोखण्यासाठी तटकरे यांनी घारे यांच्याकडे रायगडचे जिल्हाध्यक्ष पद दिले आहे. थोडक्यात कर्जतमध्ये तटकरे यांनी तगडी फिल्डिंग लावली आहे.

Sunil Tatkare And Bharat Gogawale
रायगडचे पालकमंत्री पद कोणाला? Bharat Gogawale स्पष्टच बोलले Aditi Tatkare |Sunil Tatkare|Sarkarnama

तसेच हनुमंत जगताप हे महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांचे ते सख्खे भाऊ असून ते महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचे सख्खे काका देखील आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर स्नेहल जगताप आणि हनुमंत जगताप यांनी शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम केला होता. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत अनेकांना धक्का दिला होता. तर त्यांची महाड मतदारसंघात मोठी ताकद असून ते कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

एकूणच तटकरे यांच्या या आक्रमक चाली बघता आगामी काळात रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना हा वाद आणखी चिघळू शकतो. याला शिवसेना, मंत्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे हे कसे प्रत्युत्तर देतात हे बघावे लागणार आहे. पण यामुळे आगामी स्थानिकमध्ये नेमके कोण कोणाचा काटा काढणार हे याकडेच अवघ्या रायगडवासियांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर आणि हाती येणाऱ्या निकालानंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे.

Sunil Tatkare And Bharat Gogawale
Bharat Gogawale-Aditi Tatkare: गोगावलेंना कुणी गंडवले? तटकरे-अमित शाह भेट सार्थकी लागली का?

FAQs :

1. सुनील तटकरे यांनी कोणत्या नेत्यांना पक्षात घेतले आहे?
शिवसेना आमदार महेंद्र थोरवे व मंत्री भरत गोगावले यांचे विरोधक असलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीत स्थान दिले आहे.

2. हे राजकीय पाऊल का महत्त्वाचे मानले जाते?
कारण यामुळे रायगडमध्ये शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि राष्ट्रवादीचे बळ वाढले आहे.

3. यामुळे आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल?
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्पर्धा तीव्र होईल आणि गटबाजी वाढेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com