Republican Party Of India (A) : रामदास आठवले रिपब्लिकन पक्षाला 'राष्ट्रीय दर्जा' मिळवून देणार? 4 राज्यांतून प्लॅन तयार

Republican Party Of India (A) : रामदास आठवले यांनी रिपाइ (आ) पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, लवकरच राज्यसभेवर पुन्हा येणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
Ramdas Athawale speaks on RPI(A)'s push for national party status.
Ramdas Athawale speaks on RPI(A)'s push for national party status.sarkarnama
Published on
Updated on

Republican Party Of India (A) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आठवलेंनी नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत बोलताना याबाबतचा आशावाद व्यक्त केला. सोमवारी (2 डिसेंबर) संसदेत बोलताना त्यांनी खासदार म्हणून पुन्हा येणार असल्याचाही दावा केला होता.

कार्यकारिणीत बोलताना आठवले म्हणाले,नागालँडच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने दोन जागा जिंकल्या होत्या. मणिपूरमध्ये राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला आहे. तर अरुणाचल प्रदेशात याच महिन्यात प्रदेश कार्यकारिणीची स्थापना झाली आहे. आरपीआयला सशक्त करण्यासाठी आगामी काळात 2 कोटी सदस्यांचे नोंदणी अभियान हाती घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातही रिपब्लिकन पक्षाची चांगली ताकद आहे. आठवले स्वतः महाराष्ट्रातील पंढरपूरमधून खासदार होते. याशिवाय आजही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार चांगली मते घेतात. याच मतांच्या जोरावर महाराष्ट्रात आणि नागालँड, मणिपूर, अरूणाचल प्रदेश अशा 4 राज्यांमधून पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा मिळाल्यास रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते.

Ramdas Athawale speaks on RPI(A)'s push for national party status.
Ramdas Athawale News : रामदास आठवलेंनी थेट मोदींचं नाव घेत नड्डांसमोरच खासदारकी केली फिक्स; कराड, धैर्यशील पाटलांचं काय होणार?

पुन्हा खासदार होणार :

रामदास आठवले हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले आहेत. सध्या त्यांच्याकडे केंद्रात राज्यमंत्रिपदही आहे. पण त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 2 एप्रिलला 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जेमतेम चार महिने उरले आहेत. पुन्हा एकदा भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून येण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

Ramdas Athawale speaks on RPI(A)'s push for national party status.
Ramdas Athawale: "रिपाइंत या आणि निवडणूक लढा"; शरण आलेल्या नक्षलवाद्यांना रामदास आठवले यांची मोठी ऑफर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, राज्यसभेत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे स्वागत करताना आणि शुभेच्छा देताना आठवले म्हणाले, ‘तुम्ही इथे पाच वर्षे राहाल. माझे फक्त तीन-चार महिनेच राहिलेत. पण एप्रिलमध्ये मी पुन्हा येईन. कारण मोदीसाहेब मला पुन्हा आणणार आहेत. त्यानंतर सहा वर्षे मी इथे राहील.’ हे सांगत असताना सभागृह नेते व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही सभागृहात उपस्थित होते. त्यांच्याकडे पाहत आठवलेंनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com