
Ramdas Athawale: मोस्ट वॉटेंड नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली असून गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वांनी शरणागती पत्करली आहे. आता आपण संविधानाच्या मार्गाने पुढील वाटचाल करणार असल्याचं या समर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी जाहीर केलं आहे. या शरण आलेल्या नक्षलवाद्यांना रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पक्षातून निवडणूक लढण्याची ऑफर देऊन एकच खळबळ उडवून दिली आहे.
ज्या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडला. संविधान स्वीकारले त्यांनी आता देशाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे. राजकारणात प्रवेश प्रवेश केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांना संधी देईल, अशी घोषणाही आठवले यांनी नागपूरमध्ये केली. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीत ६० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यात सहा कोटींचे बक्षीस असलेला भूपती याचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना संविधानाची प्रत देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यावर आठवले म्हणाले, "चुकीचा मार्ग निवडलेल्या व हाती शस्त्र घेतलेल्या नक्षलवाद्यांमध्ये अनेकजण उच्चशिक्षित आहेत. काही युवक सुद्धा आहेत. यापैकी ज्यांना राजकारणात येण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी रिपाइंची दारे खुली आहेत"
मुंबई महापालिकेची निवडणूक आणि उद्धव व राज ठाकरे यांच्या युतीवरही आठवले यांनी मत व्यक्त केले. दोन्ही भाऊ एकत्र लढले तर निश्चित त्यांना काही फायदा होईल. मात्र, मुंबईत महायुतीच आघाडीवर राहील. रिपाइंच्या विविध गटात विखरलेल्यांना त्यांनी एकजूट होण्याचे आवाहन केले. आपली रिपाइं हाच सर्वात मोठी आणि देशभरात कार्यरत असलेल्या पक्ष आहे, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात आणखी दोन आमदार निवडून आल्यास रिपाइंला राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळू शकतो. त्याकरिता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आठ मार्चला नागपूरमधील कस्तुरचंद पार्कवर आरपीआयचे संमेलन आयोजित केले असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी रिपाइंचे पदाधिकारी डॉ. पूरनद्र मेश्राम, राजन वाघमारे, बालू घरडे, विनोद थूल आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.