Amit Shah Raigad Tour : अमित शाहांच्या कार्यक्रमात एकाच राजेंची उपस्थिती, दुसऱ्या राजेंची आठवणही नाही...

Sambhaji Chhatrapati Shivaji Maharaj’s Death Anniversary : रागडावरील कार्यक्रमाला अमित शाहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
Amit Shah
Amit Shahsarkarnama
Published on
Updated on

Sambhaji Chhatrapati News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार पुण्यतिधी निमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती घरण्यातील वंशज देखील उपस्थित होते.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले उपस्थित असताना छत्रपती संभाजीराजे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचे दिसून आले. संभाजीराजे हे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष देखील आहेत. मात्र, ते या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावला.

संभाजीराजे कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने 'सरकारनामा'ने त्यांच्याशी संपर्क साधला असताना कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने ते उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.

Amit Shah
Maharashtra Politics: ‘एसटी’ नंतर ‘पी़ब्लू़डी’...सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर निधी कपातीची कुऱ्हाड, मंत्र्यांनीच केली मंत्र्यांची कोंडी!

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रायगडावर

मागील आठवड्यात चार एप्रिलला संभाजीराजेंनी रायगडावरील सुरू असलेल्या कामाची पाहणी देखील केली होती.त्याविषयी त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्यामध्ये म्हटले होते की, दुर्गराज रायगड वरील महादरवाजाच्या डाव्या बाजूच्या तटबंदीच्या जतन व संवर्धन कार्यास सुरुवात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या परवानगीने आणि रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने मराठा लष्करी वास्तुशास्त्राचे प्रतीक असलेल्या महादरवाजाच्या डाव्या बाजूच्या तटबंदीच्या म्हणजेच महादरवाजापासून टकमक टोकापर्यंतच्या 750 मीटर लांबीच्या तटबंदीच्या संवर्धन कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. मागील वर्षी प्राधिकरणामार्फत उजव्या बाजूच्या तटबंदीचे जतन व संवर्धन पूर्ण करण्यात आले होते.

अमित शाहांचा रायगडावरून संकल्प

अमित शाह यांनी आपल्या रायगडवारील भाषणामध्ये शिवाजी महाराजांना स्मरून संकल्प केला की, देशाच्या स्वातंत्र्याला 25 वर्ष झाली आहेत. जेव्हा 100 वर्ष होतील तेव्हा देश जगात नंबर वन होईल. स्वातंत्र्याची प्रेरणा ही शिवाजी महाराजांपासून आपण घेतली आहे. मी रायगडावर भाषण करण्यासाठी आलो नाही तर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे.

Amit Shah
Praniti Shinde Politics: प्रणिती शिंदे यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल, तुम्ही विरोधकांना शत्रू का समजता?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com