Chhatrapati Sambhajiraje : मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात जरांगे पाटील उभे करणार आहेत. मात्र, आज (शनिवारी) अचानक स्वराज पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा केली हे संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले आहे. अपक्ष उमेदवार निवडणुकीत उभे करणे धोकादायक असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितले.
संभाजीराजेंनी सांगितले, मनोज जरांगे पाटील हे ज्या ठिकाणी उमेदवार देतील त्या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार आहे. निवडणूक आयोग जे चिन्ह देईल ते स्वीकारावे लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराला आयोग वेगवेगळे चिन्ह देईल. त्यामुळे चिन्हाचा प्रचार करणे अवघड होणार आहे.
अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर कायद्याच्या नजरेतून ते अपक्ष असल्यामुळे त्यांच्यावर कोणतेही कायदेशीर बंधन लागू नसते. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतात अथवा सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देऊ शकतात. व्यावहारिकदृष्ट्या प्रत्यक्ष राजकारणात भावना चालत नाहीत. आजपर्यंत समाजाच्या नावावर निवडून आलेले बहुतांश आमदार नंतर समाजाला पाठ दाखवतात हे मागील सत्तर वर्ष आपण बघत आलो आहे, अशी भीती संभाजीराजेंनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केली आहे
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नोंदणीकृत आहे. आयोगाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. सर्व उमेदवारांना एकच चिन्ह असेल. एबी फॉर्म असणार आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सर्व आमदारांना पक्षांतर बंदी कायदा व व्हीप लागू होणार आहे. त्यांना कायदेशीर बंधने असणार आहेत. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवार न देता, स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर हे उमेदवार उभे करावेत, असा प्रस्ताव यावेळी मनोज जरांगे पाटील यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.