BJP Politics : भाजपचा 'सेफ गेम', विरोध डावलून विद्यमानांवरच लावला दाव

Assembly Election BJP Politics hemant rasane sunil kambly : भाजपने दुसरी 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये देखील कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
bhimrao tapkir hemant rasane sunil kambly
bhimrao tapkir hemant rasane sunil kamblysarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये पुणे शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधून भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान आमदारांनाच संधी दिल्याचा समोर आले आहे. तसेच पुन्हा एकदा कसबा मतदारसंघात हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर सामना रंगणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीमध्ये भाजपने पर्वती, कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली होती. आता भाजपने दुसरी 22 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये देखील कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

bhimrao tapkir hemant rasane sunil kambly
Sandip Kshirsagar: पक्ष अडचणीत असताना पवारांवर दाखवलेली निष्ठाच कामाला आली; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा उमेदवारी

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरवण्यात आला आहे. या ठिकाणी भाजप उमेदवार बदलणार अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. मात्र योग्य उमेदवार न मिळाल्याने विद्यमान आमदार सुनील कांबळे यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा उमेदवारीची माळ पडली असल्याचे बोलले जात आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये भीमराव तापकीर चौथांदा भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असणार आहेत. या ठिकाणी विद्यमान आमदाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात एंटी इनकंबेंसी असल्याने या ठिकाणी उमेदवार बदलावा, अशी जोरदार मागणी भाजपमधील स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत होती.

स्थानिक नेत्यांनी याबाबत मुंबईमध्ये जाऊन वरिष्ठांची भेट देखील घेतली होती. उमेदवारी कोणालाही द्या मात्र विद्यमान आमदार नकोत, अशी भूमिका भाजपमधील काही नेत्यांनी घेतल्याने यंदा भीमराव तापकीर यांना उमेदवारी पासून दूर राहावे लागते की काय असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, सलग चौथ्यांदा तापकीर यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे देखील या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणारच अस यापूर्वीच रमेश कोंडे यांनी सांगितला आहे. त्यामुळे आता ते नेमकं काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कसब्यात धंगेकर विरुद्ध रासने

कसबा विधानसभा मतदारसंघात मागील पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांचा काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवार बदलला जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. कसब्यात ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी देखील ब्राह्मण संघटनांकडून करण्यात आली होती. असे असताना देखील भाजपने हेमंत रासने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पराभवाचा वाचपा रासने काढणार की पुन्हा एकदा धंगेकर बाजी मारणार हे पहाव लागेल.

भाजपकडून पाच विद्यमानांना पुन्हा संधी

महायुतीचा विचार केल्यास सध्या भाजपकडून पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. भाजपने पाच विद्यमान आमदारांना निवडणूक रिंगणात उतरवला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा कडून देखील दोन विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

bhimrao tapkir hemant rasane sunil kambly
Amit Thackeray Interview : ...अन् अमित ठाकरे म्हणाले 'कर्म कुणालाच चुकत नाही'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com