संभाजीराजे छत्रपतींची पुढील दिशा ठरली! घेतला मोठा निर्णय....

Sambhajiraje chhtrapati : संभाजीराजे यांची खासदारकीची मुदत अवघे काही दिवस शिल्लक राहिली...
Sambhajiraje chhtrapati
Sambhajiraje chhtrapati Facebook
Published on
Updated on

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोठा निर्णय घेतला असून त्यांनी त्यांची पुढील वाटचाल कशी असणार आहे याबाबतची दिशाही ठरवली आहे. सोमवार (दि. १४) रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका ते स्पष्ट करणार आहेत. स्वतः संभाजीराजेंनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यामुळे उद्या ते नेमका कोणता मोठा निर्णय जाहीर करतात याबाबतच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून मी माझी पुढील दिशा ठरविलेली आहे. याबाबत सोमवार (दि. १४) रोजी सकाळी ११ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ती स्पष्ट करणार आहे.

दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांच्या निकटवर्तीयांशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारनामाशी बोलताना मराठा आरक्षण आंदोलनाच्या दिशेबाबत हा निर्णय असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. खासदार संभाजीराजे यांनी मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय उचलून धरला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं देखील केली. याशिवाय मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून त्यांनी सरकारपुढे ५ मागण्या ठेवल्या होत्या. मात्र त्या मागण्यांची अद्याप पुर्ताता झालेली नाही.

संभाजीराजे भाजप सोडणार?

मराठा आरक्षणासोबतच संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदतही येत्या जून महिन्यामध्ये संपत आहे. मात्र पक्षीय चौकटीत न अडकल्याने भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांची आगामी राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार यावरुन चर्चा सुरु असतानाच नुकत्याच त्यांनी वाढदिवसादिवशी लिहिलेल्या फेसबूक पोस्टमधून चर्चांना अधिक हवा मिळाली होती. यातून ते भाजपची साथ सोडणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमके काय म्हटले होते संभाजीराजे छत्रपती यांनी?

आज वयाची ५१ वर्षे पूर्ण करून ५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्री शिवछत्रपती महाराजांच्या वैभवशाली वंशपरंपरेत माझा जन्म झाला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मात्र याबरोबरच लोककल्याणाचे दायित्वही जन्मतःच आपल्यावरती येते, याचीही मला सर्वथा जाणीव आहे. छत्रपती घराण्याचा हा लोककल्याणाचा वारसा समर्थपणे पेलण्यासाठी श्री शिवछत्रपती महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या विचारांची आस घेऊन मी सदैव कार्यरत आहे.

माझ्या जीवनात आलेली प्रत्येक संधी ही मी लोककल्याणाचे साधन म्हणूनच स्वीकारली व त्याकरिताच ती वापरली देखील! माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील, मात्र माझ्या घराण्याच्या विचारांशी निष्ठा ठेऊन, पूर्वजांनी माझ्यावर सोपविलेल्या माझ्या जन्मजात कर्तव्याचे निर्वहन करण्यासाठी मला गरज आहे ती आपणा सर्वांच्या विश्वासाची व भक्कम पाठबळाची....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com