
पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव प्रकरणात 'सनातनी दहशतवाद' असं म्हणायला हवं असं वक्तव्य केलं.
त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी "सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं" असा वादग्रस्त आरोप केला.
यवत (पुणे) मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपला जबाबदार धरले, यावर भाजपने प्रत्युत्तरात तीव्र टीका केली.
Mumbai News : काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी या प्रकरणात 'भगवा दहशतवाद' असा शब्द कोणीही वापरू नका. तो 'सनातनी दहशतवाद' होता, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर चव्हाण यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले होते. तर भाजपने टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी "सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध अन् संभाजी महाराजांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच" असे वक्तव्य केले. त्यामुळे तणाव वाढला होता. त्यातच आमदार रोहित पवार यांनी देखील यात उडी घेत भाजप नेत्यांच्या सभेमुळे यवतमध्ये तणाव वाढला, असा आरोप केला. यानंतर आता या प्रकरणावर भाजपने प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
उपाध्ये यांनी, रोहित पवार व जितेंद्र आव्हाड यांचा हिंदू द्वेष काही केल्या कमी होणार नाही. तसेच मतांच्या राजकारणासाठीही ते करत असणाऱ्या लांगूलचालनमध्येही काधीही कमी येणार नाही. आव्हाड, पवार हिंदू समाजाचं समर्थन करत नाहीत. त्यांना गुन्हेगारच समजतात. पण दहशतवाद्यांचे कौतुक याच आव्हाडांनी केले होते, असा दावा उपाध्ये यांनी केला आहे.
त्यांनी, इशरत जहॅा विसरलात का? बाटला हाऊस येथे दहशतवाद्यांचे एन्काऊंटर झाल्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या डोळ्यात अश्रू आले होते, ते विसरलात का? भगव्या रंगावरून दहशतवाद हा शब्द काँग्रेसने आणला, हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, असेही उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
यावेळी उपाध्ये यांनी, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ‘सनातनी दहशतवादी’ वक्तव्यावर पलटवार केला. आव्हाड यांनी बरीच पोपटपंची केली. आता त्यांनी, पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा मुस्लिम दहशतवादी असा एकदा उल्लेख करत निषेध करून दाखवावा, असे आवाहन केले आहे. तर सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या यांना फुटतात, मात्र मुस्लिम दहशतवादी म्हणताना तोंड उघडत देखील नाही. इशरत जहाँचा गौरव करणाऱ्या बाटग्यांना सनातन धर्माबद्दल बोलायचा नैतिक अधिकारच नसल्याचा टोला उपाध्ये यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.
रोहित पवार यांना दौंडमध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा अपमान झाला, तेव्हा हिंदू आठवले नाहीत का?, असा सवाल उपाध्ये यांनी केला. तसेच तुमचे सरकार असताना हनुमान चालिसा म्हटल्याबद्दल नवनीत राणा यांना तुरुंगात डांबले? तेव्हा हिंदू आठवले का? आता हिंदू दहशतवादाचा नॅरेटीव्ह पसरविण्यासाठी हिंदू शेतकरी आणि युवकांची तुम्हाला आठवण आली. असल्या ढोंगीपणाला जनता फसणार नाही. तुमचे खरे रूप हिंदू समाज ओळखून असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
1. पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकं काय विधान केलं?
त्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात 'भगवा दहशतवाद' ऐवजी 'सनातनी दहशतवाद' हा शब्द वापरण्याची गरज आहे असं म्हटलं.
2. जितेंद्र आव्हाड यांचं विधान काय होतं?
त्यांनी विधान केलं की "सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं आहे," ज्यावर मोठा राजकीय वाद निर्माण झाला.
3. भाजपने काय प्रतिक्रिया दिली?
भाजपने आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर टीकेचा भडिमार करत, त्यांच्यावर देशविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.