Sanjay Gaikwad : मारकुट्या संजय गायकवाड यांना पोलिसांचा दणका; वाचवण्याचे सारे प्रयत्न 'फडणवीसांनी' एका आदेशाने उधळले!

Sanjay Gaikwad News : आकाशवाणी आमदार निवासात कॅन्टिन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अखेर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad faces FIR
Shiv Sena MLA Sanjay Gaikwad faces FIR Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Gaikwad News : आकाशवाणी आमदार निवासात कॅन्टिन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अखेर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. अपमानित करणे, मारहाण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (11 जुलै) सकाळी माध्यमांशी बोलताना, तक्रारीची वाट न बघता गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानुसार मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांना वाचविण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न झाल्याचे दिसून आले होते. दोन दिवसांपासून आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुरु होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून इतर आमदारांनी केवळ ही मारहाण चुकीचे असल्याचे म्हणत आपण गायकवाड यांच्यासोबत बोललो असल्याचे सांगितले होते.

अधिवेशन काळात अधिकारी, कर्मचारी आणि आमदार यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी आहार समिती काम करते. या आहार समितीकडे जेवणाची व्यवस्था करण्यापासून तक्रार आणि कारवाईची शिफारस करण्याचे अधिकार असतात. या समितीचे अध्यक्षपद सध्या शिवसेना आमदार बालाजी किणीकर आहेत. पण या समितीने आमदार गायकवाड यांची तक्रार करण्याबाबत पुढाकार घेतला नसल्याचे दिसून आले.

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad faces FIR
MLA Sanjay Gaikwad first reaction : बलात्काराचा गुन्हा आहे का? पोलिसांना अधिकारच नाही; विरोधकांना 'नालायक' म्हणत संजय गायकवाड अजूनही 'मगरूरीत'

अशात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही अद्याप तक्रार आलेली नाही. त्यामुळे गुन्हाही दाखल झाला नसल्याचे सांगितले. "अद्याप तक्रारच आलेली नाही आहे. तक्रार आली तर गुन्हा दाखल होईल. विधिमंडळाच्या आवारात ही घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांनी पण हेच सांगितलं आहे. मात्र तक्रारच दाखल नाही झाली. तक्रार झाली तर गुन्हा दाखल होईल असे कदम यांनी म्हंटले होते.

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad faces FIR
Sanjay Shirsat: नोटांच्या बॅगेसह सिगारेट ओढताना संजय शिरसाटांचा खळबळजनक व्हिडिओ व्हायरल! म्हणाले, व्हिडिओ माझाच पण...

मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी योगेश कदम यांचा खोटा ठरवला. "चौकशीसाठी कुणी तक्रार करायलाच हवी असे नाही. पोलीस स्वतः चौकशी करू शकतात आणि ते नक्की योग्य कारवाई करतील, यात फोर्स किती अप्लाई केला आहे हे ही पाहिले जाईल, असे म्हणत कारवाईचे स्पष्ट आदेश दिले. त्यानंतर अखेर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com