Sanjay Jadhav Challenges Manoj Jarange : खासदार संजय जाधवांचे मनोज जरांगेंना आव्हान? स्पष्टच सांगितलं, 'कार्यक्रम रद्द होणार नाही...'

Sanjay Jadhav VS Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी कार्यक्रम रद्द करण्यास सांगून देखील खासदार संजय जाधव हे कार्यक्रम घेण्यावर ठाम आहेत. त्यांनी कार्यक्रम रद्द होणार नसल्याचे सांगितले.
Shivsena UBT MP sanjay jadhav
Shivsena UBT MP sanjay jadhavsarkarnama
Published on
Updated on

Sanjay Jadhav News : मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत परभणीतील शेतकरी मेळावा लगेच रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र, खासदार संजय जाधव यांनी हा मेळावा रद्द होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जाधव यांनी थेट जरांगेंना चॅलेंज केल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज परभणीमध्ये संजय जाधव यांनी शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. मात्र, जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना हा मेळावा घेतला जात असल्याने मराठा समाजातील कार्यकर्ते त्यावर आक्षेप घेत होते. अखेर जरांगे पाटील यांनी खासदार जाधव यांना फोन करून हा मेळावा रद्द करण्यास सांगितले होते.

खासदार जाधव यांनी मागील 15 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचे सांगत हा कार्यक्रम रद्द करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. जाधव म्हणाले, कार्यक्रम रद्द करावा हे माझ्या मनाला योग्य वाटत नाही. सगळं ठरलंय, कार्यक्रमाची तयारी झाली आहे. लोकं आले आहेत, कार्यक्रम ऑन दी स्पाॅट कॅन्सल करा या भावनेचे मी आदर करतो पण असं होणार नाही. तुमच्या भावनांचा आदर आहे.

Shivsena UBT MP sanjay jadhav
Manoj Jarange Patil Angry : मनोज जरांगे प्रचंड संतापले, एकनाथ शिंदे-संजय जाधवांचा एकेरी उल्लेख; म्हणाले, 'मराठ्यांच्या उरावर मेळावा...'

बंडूने मोठी चूक केली...

मनोज जरांगे पाटील म्हणाले, संजय जाधवला मराठ्यांनी मोठा केला, तो आता शिरसाट, बावनकुळेंच्या टोळीत सामील झाला आहे. मी आत्ता परभणीला जाईल पण शिकार भेटणार नाही. पण मी बघतो त्यांना. बंडूने मोठी चूक केली. संजयच्या दुखाची दिवस सुरू झाली. परभणीत ताकद वाया घालवण्यापेक्षा मुंबईत ताकद दाखवू. शिंदेंनी रद्द करायचा ना कार्यक्रम.

परभणीतील मराठ्यांनी ताकद वाया घालवू नये, आपल्याला मुंबईला जायचे आहे. मुंबईसाठी ताकद राखून ठेवा, असे आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केले.

Shivsena UBT MP sanjay jadhav
Manoj Jarange : 'गद्दारीचा डाग आमच्यामुळे पुसला, डबल गेम...', मनोज जरांगे एकनाथ शिंदेंना नको नको ते बोलले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com