

Shivsena news : 50 आणि 100 कोटी रुपयांवर खरेदी केलेल्या खासदार आमदारांवर केंद्र आणि राज्यातले सरकार चालवले जात आहे. अमित शाह वारंवार महाराष्ट्रात आणि मुंबईत का येतात? गृहमंत्र्यांची मुंबईत काय काम आहे? असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार खरेदींचा रेट दीडशे कोटींवर गेला असल्याचा खळबळजनक आरोप केला.
भाजप सरकारला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केंद्रात डीलिमिटेशनचे बिल मंजूर करून घ्यायचे आहे. यासाठी खासदार खरेदी होलसेल दराने सुरू आहे. शंभर कोटीहून हा भाव दीडशे कोटीपर्यंत वाढवण्यात आला आहे. लोकसभेची हिवाळी अधिवेशन का घेतली जात नाही? यामागे खासदार खरेदीला वेळ मिळावा, त्याची जुळवाजुळव करता यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या दोन लाखांपर्यंतच्या व्यवहारावर आयकर विभागाची नजर असेल या निर्णयावर राऊत यांनी कडाडून टीका केली. एकेक लाखांना मत विकत घेणाऱ्यांना आधी हे दिसले नाही का? दोन लाखांच्या व्यवहारावर नजर ठेवणार, हा किती मोठा, महान विचार आहे, अशी खिल्ली उडवत संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपवर गंभीर आरोप केले.
उद्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील खासदारांनी डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा दिला, मंजुरी दिली तर माझा दीडशे कोटींचा आकडा लक्षात ठेवा, संजय राऊत यांची बातमी अगदी खरी असते, असे सांगत त्यांनी माध्यमांना आवाहन केले. अमित शहा वारंवार महाराष्ट्रात आणि मुंबईत कशासाठी येतात? असा सवाल करत संजय राऊत यांनी त्याचे कनेक्शन थेट खासदार खरेदीशी जोडले.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा भाव जसा जाहीर होतो तसा खासदार खरेदीचा हा राष्ट्रीय भाव असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला. आमचे सहा खासदार त्याचमुळे गेले, पंधरा कोटी त्यांना आधीच मिळाले होते निवडून आल्यावर, इतरांविषयी मी आता भाष्य करणार नाही, असेही राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.