Operation Tiger : राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'? एका आमदाराला 20 कोटींची ऑफर; उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्याचा मोठा दावा

Operation Tiger News : उद्धव ठाकरेंचे विधानसभेतील 14 आमदार संपर्कात असल्याचे दावा शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जात आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील राजकारणात गेल्या 15 दिवसापासून मोठ्या वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात ऑपरेशन टायगर राबवत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या सेनेला जोरदार धक्के दिले आहेत. लोकसभेतील सहा खासदार फोडून शिंदेंनी त्यांच्या पक्षाची दिल्लीतील ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

त्यासोबतच विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीवेळी मोठी खेळी करीत त्यांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांना संधी देत जवळ केले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे विधानसभेतील 14 आमदार संपर्कात असल्याचे दावा शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जात आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय बड्या नेत्यानी मोठा दावा केला असून राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून पुन्हा एका आमदाराला 20 कोटींची ऑफर दिल्याच्या दाव्याने खळबळ माजली आहे.

राज्यातील उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांना विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाची संधी देत जवळ केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यासोबतच गेल्या आठ दिवसांत विधानपरिषदेच्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. खासदार-आमदार पक्षांतर करू लागल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता पुन्हा एका आमदाराला 20 कोटींची ऑफर दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Live Update : घुले हत्या प्रकरणात एसआयटीला सहकार्य करणार - बजरंग सोनवणे

खासदार राऊत यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राऊत यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना राज्यात सुरु असलेल्या फोडाफोडीच्या या राजकारणावर सडकून टीका केली आहे. ‘तुम्ही आमदार आणि खासदार फोडत आहात. कार्यकर्ते फोडत आहेत. पैसे देत आहात. लिंगाडे नावाच्या आमदाराला २० कोटी ऑफर दिली, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Live Update : घुले हत्या प्रकरणात एसआयटीला सहकार्य करणार - बजरंग सोनवणे

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी, त्यांच्या प्रकृतीबरोबर महाराष्ट्राच्या प्रकृतीलाही आराम पडो, पापाचा पैसा तुमच्या मुलाबाळांना पचणार नाही असे नाव न घेता म्हटले आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Live Update : घुले हत्या प्रकरणात एसआयटीला सहकार्य करणार - बजरंग सोनवणे

खासदार संजय राऊत यांनी यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. त्यासोबतच येत्या याकाळात उद्धव ठाकरे यांची शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे राऊत यांनी केलेल्या या टीकेला शिंदे यांच्या शिवसेनेकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार याकडे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Live Update : घुले हत्या प्रकरणात एसआयटीला सहकार्य करणार - बजरंग सोनवणे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com