Sanjay Raut : निवडणूक आयुक्त भाजपच्या हस्तकाप्रमाणे वागले, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Chief Election Commissioner Gyanesh Kumar : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. राहुल गांधींकडे जे प्रतिज्ञापत्र ते मागत आहेत ते भाजपच्या नेत्यांकडून का नाही मागत असा सवाल त्यांनी केला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : 'मत चोरी'चा आरोप करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पाच प्रश्न विचारले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींना सात दिवासांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. निवडणूक आयुक्तांनी वापरलेल्या भाषेवरून वाद सुरू आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला आहे.

'निवडणूक आयुक्त जे बोलले त्याला मग्रुरी म्हणतात. ही मग्रुरी निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी बसलेल्या, संवैधानिकपदी बसलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही. हा अर्रोगंस भाजपच्या हस्तकांकडून अपेक्षित आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयुक्त वागले आहेत.', असा हल्लाबोल राऊतय यांनी केला.

'प्रतिज्ञापत्र कोणाकडे मागताय? अनुराग ठाकूर यांनी देखील तोच आरोप केला आहे. ज्ञानेश कुमार हे ज्या पक्षासाठी वकीली करत आहेत त्या पक्षाच्या अनुराग ठाकूर आणि अन्य लोकांनी राहुल गांधींनी प्रमाणे मत चोरी, डुप्लिकेट मतदार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र मागण्याची हिंमत निवडूणूक आयुक्तांकडे आहे का?', असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले आहे त्यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयुक्तांनी दिले नाही. सगळ्यातआधी केंद्रीय मंत्र्याकडे प्रतित्रापत्र मागवा, असा देखील राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Vote Chori News : ‘मत चोरी’ प्रकरण थेट महाभियोगापर्यंत पोहचणार? मुख्य निवडणूक आयुक्तांना बसणार धक्का?  

वेणुगोपाल राव यांचा उद्धव ठाकरेंना फोन

उपराष्ट्रपति‍पदासाठी एनडीएकडू महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. काल राधाकृष्णन यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना के सी वेणुगोपाल यांनी फोन केला होता, असे संजय राऊत यांनी सांगितले. इंडिया ब्लाॅक मिळून उमेदवार ठरवेल असे त्यांनी म्हटले.

Sanjay Raut
Ajit Pawar Politics : भुजबळांचे चिमटे, दादांनी हळूच फडणवीसांकडे पास केला चेंडू

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com