
Mumbai News : डॉ. नीलम गोऱ्हे यांना विधान परिषद उपसभापतीपदावरुन हटविण्याचा चंग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बांधला आहे. त्यासाठी गोऱ्हेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोऱ्हे यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर संताप व्यक्त होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा ठराव आणला जाणार असल्याचे सांगण्यात येते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याने ठाकरेंचा पक्ष चांगलाच संतप्त झाला. गोऱ्हे यांनी आतापर्यंत किती पद भोगली याचा हिशोब देण्यात आला. त्याबदल्यात गोऱ्हे यांनी किती मर्सिडिज दिल्या याचा हिशोब मागितला गेला.
आता याच आरोपानंतर गोऱ्हे यांना उपसभापतीपदापदावरून हटविण्याचा चंग ठाकरे यांच्या पक्षाने बांधला आहे. त्यासाठी गोऱ्हेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली आहे. पण उपसभापतींवर अविश्वास ठराव आल्यानंतर पुढील एक वर्ष असा ठराव आणता येत नाही असा नियम आहे. यापूर्वी गोऱ्हे यांच्याविरोधात भाजपच्या (BJP) प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव आणला होता. त्यावेळी त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात होत्या.
त्यानंतर गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश करत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. हा पक्षप्रवेश झाल्यानंतर भाजपने गोऱ्हेंविरोधात अविश्वास ठराव मागे घेतला. त्यानंतर दरेकर यांनीच गोऱ्हे यांच्याबद्दलचा विश्वासदर्शक ठराव आणला आणि सभागृहात मान्यही झाला. या घडामोडींना आता एक वर्ष पूर्ण झाले का? हे तपासून पाहिले जात आहे. एक वर्ष पूर्ण झाले असल्यास गोऱ्हे यांच्याविरोधात पुन्हा अविश्वास ठराव आणण्याची तयारी ठाकरे यांच्या पक्षात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.