Neelam Gorhe : ठाकरे सेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंना भेटल्या? ‘ भेटले असते तर त्याबाबत जाब विचारला असता : गायकवाड

Shivsena UBT Deputy Leader Meet Neelam Gorhe : भेटीची चर्चा म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. मी स्वतःशी आणि पक्षाशी प्रामाणिक आहे, त्यामुळे नीलम गोऱ्हे यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही.
Neelam Gorhe-Asmita Gaikwad
Neelam Gorhe-Asmita GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 March : विधान परिषदेच्या उपसभापती तथा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड ह्या भेटल्याची चर्चा आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर या भेटीबाबत उत्सुकता आहे. मात्र, अस्मिता गायकवाड यांनी भेटीचे वृत्त फेटाळून लावले आहे. मी सर्वांसमोर जाऊन भेटले असते आणि उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही असे का वागलात, असा सवाल केला असता, असे गायकवाड यांनी सांगितले

उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) आणि अस्मिता गायकवाड यांची भेट झाल्याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत साहित्य संमेलनात बोलताना ‘दुसऱ्या शिवसेनेत दोन मर्सिडिज दिल्या तर पद निश्चित’ असे समीकरण होते, असे विधान केले होते. गोऱ्हे यांच्या त्या विधानावरून राज्यात प्रचंड राजकीय धुरळा उडाला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena UBT) एकूण एक नेते नीलम गोऱ्हे यांच्यावर तुटून पडले आहेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे होते, अशा शब्दांत फटकारले होते. तसेच, आयोजक आणि साहित्यिकांकडून त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दुसरीकडे, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचे नेते त्याचे समर्थन करताना दिसत आहेत.

Neelam Gorhe-Asmita Gaikwad
Praniti Shinde : दिल्लीत पोचलेल्या प्रणिती शिंदेंना सोलापुरातील काँग्रेसच्या पडझडीची ना चिंता ना पश्चाताप!

त्या पार्श्वभूमीवर गोऱ्हे आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या भेटीबाबत सोलापुरात उत्सुकता होती. त्या संदर्भात गायकवाड यांच्या संपर्क साधला असता त्यांनी गोऱ्हे यांच्याशी भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले. भेटीची चर्चा म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. मी स्वतःशी आणि पक्षाशी प्रामाणिक आहे, त्यामुळे नीलम गोऱ्हे यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही.

मला नीलम गोऱ्हे यांची भेट घ्यायची असती तर सर्वांसमोर जाऊन भेटले असते. त्या भेटीत नीलम गोऱ्हे यांना ‘तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत असं का वागलात,’ असा सवाल केला असता. गोऱ्हे यांना पक्षाने चार वेळा आमदारकी, विधान परिषदेचे उपसभापती दिलं. तुम्ही खाल्या मिठाला जागायला पाहिजे होते, अशी विचारणा केली असता, असा दावाही गायकवाड यांनी केला.

Neelam Gorhe-Asmita Gaikwad
Uttam Jankar : जानकरांची अजितदादांसोबत अर्धा तास चर्चा; मात्र राष्ट्रवादी नेत्याचा भलताच इशारा, 'जानकरांचा पुढचा प्रवास सोबत होऊ देणार नाही'

आम्ही मोठ्या विश्वासाने तुमच्यासोबत होतो. तुमच्या विधानामुळे आमची मनं दुखावली आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंची पहिली माफी मागावी, अशी मागणी भेट घेतली असती तर नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली असती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com