Uddhav-Raj Thackeray news : संजय राऊतांनी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधला! ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा : कुठे कुठे एकत्र लढणार?

Thackeray brothers alliance News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणाच केली आहे.
Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance
Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliancesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याने सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने प्लॅनिंग केले आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेल्या राज व उद्धव ठाकरे बंधूनी एकत्र येत मेळावा घेतला. त्यानंतर आता येत्या काळात मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येत निवडणूक लढणार असल्याचे आता जवळपास फायनल झाले आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणाच केली आहे. त्याशिवाय आगामी काळात मुंबई महापालिकेसह अन्य कोणत्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र येणार हे सांगून टाकले आहे.

नाशिक येथे स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली. प्रसार माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, 'आगामी काळात मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबवली व नाशिक या महापालिकेत मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येत निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येत्या काळात शिवसैनिकानी तयारीला लागावे, अशा सूचना केल्या.

Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance
Narendra Modi Independence Day : पीएम मोदींचे स्वातंत्र्यदिनानिमित्त आतापर्यंतचे खास 'लूक'

ठाकरे बंधूनी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर वरळीत 5 जुलैला एकत्र येत मेळावा घेतला होता. त्यानंतरच ठाकरे बंधू एकत्र आले होते. मात्र, राजकीयदृष्टया दोघे कधी एकत्र येणार याची उत्सुकता लागली होती. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे दोघे बंधू एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance
PM Modi Warning to Pakistan : लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा, 'अणुबाॅम्बच्या धमकी...'

त्यातच आता ठाकरे बंधूनी मुंबई महापालिका निवडणुकीसोबतच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत. या सोसायटीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance
BJP vice president candidate : कट्टर संघाचा माणूस उपराष्ट्रपतीपदावर होणार विराजमान? की PM मोदी पुन्हा 'जाट' कार्ड खेळणार? : दोन नावांनी वाढवला सस्पेन्स

दरम्यान, मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबवली व नाशिक या महापालिकेत मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येत निवडणूक लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केल्यानंतर मनसेचे नेते अभ्यंकर यांनी मराठी माणसाची एकजूट कोणीच तोडू शकत नाही, असे सांगत युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील, असे स्पष्ट केले.

Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance
Raj Thackeray : मध्यस्थीची मागणी करणाऱ्या जैन मुनीला राज ठाकरेंनी सुनावलं, 'कोर्टाचा निर्णय...'

दरम्यान, गुरुवारी राज ठाकरे (Raj thackeray) यांनी मनसेचा मुंबईत मेळावा घेतला. या मनसेच्या मेळाव्याप्रसंगी बोलताना राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे, शिवसेना या दोघांचीच तळागाळापर्यंत ताकद असल्याचे सांगत पहिल्यांदाच भाजपला शिंगावर घेतले. तर तर दुसरीकडे युतीच्या दृष्टीने महत्त्वाची मानले जात असलेले विधान त्यांनी केले आहे. या विधानांमधून राज यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा मनसेच्या गोटात आहे.

Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance
BJP News: वाहतूक पोलिसांचा सीएम फडणवीसांच्या जवळच्या आमदाराला मोठा दणका; नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com