BJP vice president candidate : कट्टर संघाचा माणूस उपराष्ट्रपतीपदावर होणार विराजमान? की PM मोदी पुन्हा 'जाट' कार्ड खेळणार? : दोन नावांनी वाढवला सस्पेन्स

BJP political strategy News : भाजपच्या मित्रपक्षांनी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिले आहेत.
JP Nadda, Narendra Modi, Amit Shah
JP Nadda, Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : उपराष्ट्रपती पदाचा जगदीप धनखड यांनी महिनाभरापूर्वी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यासाठी आता भाजपप्रणित एनडीएकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

दुसरीकडे विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचे नेतेदेखील उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर चर्चा करण्यासाठी 18 ऑगस्टला भेटणार आहेत. भाजपच्या मित्रपक्षांनी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिले आहेत. त्यामुळे कट्टर संघाचा माणूस उपराष्ट्रपतीपदावर विराजमान होणार की PM मोदी पुन्हा 'जाट' कार्ड खेळणार यामुळे सस्पेन्स वाढला आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी 9 सप्टेंबरला मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणीही होईल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळेच सत्ताधारी व विरोधी पक्षात वेगाने घडामोडी घडत आहेत. लोकसभा आणि राज्यसभेत भाजपकडे (BJP) स्पष्ट बहुमत असल्याने त्यांच्या उमेदवाराला निवडून येताना अडचण येणार नाही.

JP Nadda, Narendra Modi, Amit Shah
BJP Politics : पृथ्वीराज पाटील एकटेच गेले नाहीत... उरलसी सुरली काँग्रेसच मोकळी केली, दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

उपराष्ट्रपती पदासाठी या चार नावांची चर्चा

भाजपप्रणित एनडीएकडून उपराष्ट्रपती पदासाठी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आणखी एक नाव सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर (Om Mathur) यांचेही आहे. संघाचे प्रचारक शेषाद्री चारी यांचे नाव स्पर्धेत आघाडीवर आहे. त्यानंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नावाचीही चर्चा आहे. देवव्रत जाट समाजाचे आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडदेखील जाट समाजाचे होते. त्यामुळे भाजप उपराष्ट्रपती पदासाठी पुन्हा 'जाट' कार्ड खेळणार? का याची उत्सुकता लागली आहे.

JP Nadda, Narendra Modi, Amit Shah
Devendra Fadnavis: "कोणी काहीही खावं, सरकारला..."; 15 ऑगस्टला मटण-चिकन बंदीच्या चर्चांवर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

ओम माथुर :

सिक्कीमचे राज्यपाल ओम माथुर यांचे नाव स्पर्धेत आहे. 73 वर्षीय माथुर राजस्थानचे राज्यपाल आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते गुजरातचे निवडणूक प्रभारी होते. त्यांना मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जवळचे मानले जाते. माथुर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत.

JP Nadda, Narendra Modi, Amit Shah
Kailas Gorantyal Offer Shivsena District President : भाजपात जाताच कैलास गोरंट्याल यांची थेट ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाला पक्षात येण्याची ऑफर!

थावरचंद गेहलोत :

त्याशिवाय या पदासाठी चर्चेत असलेले थावरचंद गेहलोत सध्या कर्नाटकचे राज्यपाल आहेत. 77 वर्षीय गेहलोत हे राज्यसभेत सभागृहाचे नेते राहिले आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषवले आहे. ते भाजपमधील सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था असलेल्या संसदीय मंडळाचे सदस्य देखील राहिले आहेत. ते जातीय समीकरणात (दलित) देखील बसतात. ते मध्य प्रदेशातील आहेत. त्यांना प्रशासकीय अनुभव देखील आहे.

JP Nadda, Narendra Modi, Amit Shah
Pune BJP : निवडणुकीच्या रणांगणासाठी भाजप सज्ज! पुणे कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी; मिसाळ आऊट, मोहोळ इन!

आचार्य देवव्रत :

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नावाचीही या पदासाठी चर्चा आहे. देवव्रत जाट समाजाचे आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडदेखील जाट समाजाचे होते. हरियाणाच्या समालखामधून येणारे आचार्य देवव्रत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राहिले आहेत. भाजपने जातीय समीकरणांवर लक्ष दिल्यास आचार्य देवव्रत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो.

JP Nadda, Narendra Modi, Amit Shah
Raj Thackeray : मध्यस्थीची मागणी करणाऱ्या जैन मुनीला राज ठाकरेंनी सुनावलं, 'कोर्टाचा निर्णय...'

शेषाद्री चारी :

या पदासाठी शेषाद्री चारी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांची ओळख कट्टर संघाचा माणूस अशी आहे. ते एक ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय कार्यकर्ते आणि परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत. आरएसएसचे प्रखर विचारवंत असून सध्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो.

JP Nadda, Narendra Modi, Amit Shah
NCP News : मुंबई महापालिकेची धुरा नवाब मलिकांच्या खांद्यावर; महायुती झाल्यास भाजपला त्यांच्यासोबतच करावं लागणार काम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com