Tara Rani : 'शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले?', खासदाराने व्यक्त केला संताप; जैन मुनींच्या 'त्या' वक्तव्यावर राग!

Sanjay Raut on Acharya Nayan Padmasagar : जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी ताराराणी या जैन होत्या असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
Sanjay Raut reacts to Acharya Nayan Padmasagar’s controversial speech on Tara Rani issue.
Sanjay Raut reacts to Acharya Nayan Padmasagar’s controversial speech on Tara Rani issue.sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी भाषणात महाराणी ताराराणी या जैन होत्या, असे उल्लेख केला. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

ते म्हणाले, 'काय सुरू आहे महाराष्ट्रात? शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या.'

राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, 'औरंगजेबाशी झुंज देणाऱ्या वीरांगना ताराराणींचे धर्मांतर करण्याचा अधिकार याना दिला कोणी? ताराराणी शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकल्या सुनबाई म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या!

ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत. का?कशासाठी? उद्या हे सांगतील आमच्या मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे सुद्धा जैन होते!यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील!, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Sanjay Raut reacts to Acharya Nayan Padmasagar’s controversial speech on Tara Rani issue.
Kalpana Kharat Investigation : ऐशोआरामी जीवनात रमलेली कल्पना खरात; लग्नपूर्वी होती सुनीता, कुटुंबाची 'हिस्ट्री' समजावून घ्या...

तथ्यहीन, अतिशय बेजाबदारपणाचे वक्तव्य...

जैन मुनींच्या वक्तव्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असलेल्या स्वराज्यरक्षिका करवीरसंस्थापिका छत्रपती ताराबाई महाराणीसाहेब यांच्याबाबत एका मुनींनी केलेले वक्तव्य धादांत तथ्यहीन व अतिशय बेजाबदारपणाचे आहे. धार्मिक गुरुपदावर असणाऱ्या व्यक्तींनी महान व्यक्तिमत्त्वांबाबत खोटे दावे करणे हे अत्यंत अशोभनीय आहे. शांतताप्रिय असणाऱ्या समाजाच्या या मुनींनी विनाकारण वाद निर्माण करू नयेत.

Sanjay Raut reacts to Acharya Nayan Padmasagar’s controversial speech on Tara Rani issue.
Rupali Chakankar News: चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर फार्महाऊसवर 'मुळशी पॅटर्न' जंगी पार्टी ? एका 'स्टेटस'मुळे फुटलं बिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com