Sanjay Shirsat uddhav Thackeray
Sanjay Shirsat uddhav Thackeray sarkarnama

Sanjay Shirsat News : ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षाची शिंदेंच्या आमदाराकडून पाठराखण, म्हणाले, 'मार्ग दाखवला आहे...'

Shivsena News : राज्यात केवळ फक्त सांगलीतच हे घडलं नाही. तर, अनेक मतदारसंघात असे राजकारण घडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचा फायदा काँग्रेस आणि शरद पवार यांना होणार आहे, असे शिरसाट म्हणाले.
Published on

Shivsena News : सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी हजेरी लावल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आघाडी धर्माला छेद देत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत ठाकरे गटाची उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधातच शड्डू ठोकला होता. त्यामुळे लोकसभेच्या राजकारणात जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी काँग्रेसनं आमचा विश्वासघात केला असे म्हणत विधानसभेला धडा शिकवणार असल्याचेही म्हटले. त्यालाच धरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

विभूतेंची जी भूमिका आहे तेच आमची भूमिका आहे. आमची विचारधारा वेगळी आहे. त्यांच्यासोबत फरपटत जाण्यापेक्षा वेगळे झालेले बरे, हीच भूमिका आम्ही घेतली आहे. आमच्या याच विचाराला सांगलीतील जिल्हाप्रमुखांनी पुष्टी दिली आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट Sanjay Shirsat इतक्यावरच थांबले नाहीत तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sanjay Shirsat uddhav Thackeray
Gajanan Kirtikar News : शिंदेंची डोकेदुखी वाढली; शिलेदारांमध्ये जुंपली; कीर्तिकरांमुळे महायुतीतील वातावरण तापले

सांगलीसह आणि अनेक मतदारसंघात शिवसेना Shivsena ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय पाहून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मनस्ताप होतोय. त्यामुळे सांगलीच्या जिल्हाप्रमुखांनी केलेलं वक्तव्य हे उद्धव ठाकरे यांना मार्ग दाखवणार आहे, असे विधान संजय शिरसाठ यांनी केले आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'राज्यात केवळ फक्त सांगलीतच हे घडलं नाही. तर, अनेक मतदारसंघात असे राजकारण घडले आहे. शिवसेना ठाकरे गटाचा फायदा काँग्रेस आणि शरद पवार यांना होणार आहे. शिवसेना पक्षाची वाताहत लावण्याचे काम संजय राऊत यांनी केलं. त्याचाच फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला होणार. जो शिवसैनिक हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काँग्रेस विरोधात लढला. त्यालाच आता त्यांच्या मागे लाचारा सारखं जावे लागत आहे हे दुर्दैव आहे.', असा निशाणा शिरसाठ यांनी लगावला.

(Edited By Roshan More)

Sanjay Shirsat uddhav Thackeray
Kerala Lok Sabha 2024: डावे डोके वर काढू देईना, 'कमळ' फुलेना, 'हात' हलेना!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com