Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्याप्रकरणात नव्या व्यक्तीची एन्ट्री; आरोपी चाटे आणि केदारच्या जबाबात धक्कायदायक माहिती

Beed Murder Case : संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ समोर आले आहेत. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशात आता आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबात आणखी एक खुलासा सोमर आला असून त्यांनी एका व्यक्तीने नाव घेतले आहे.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची हत्या करण्यात आली होती. या निर्घृणपणे हत्या झालेल्या हत्येची आता व्हिडिओ समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यभर संताप उसळण्याची शक्यता आहे. तर देशमुख यांची हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे व महेश केदार यांनी दिली होती. आता याच कबुली जबाबात त्यांनी आणखी एक खुलासा केला असून एका व्यक्तीचे नाव घेतलं आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं होतं. यामुळे राजकारणात मोठ्या घडामोडी घडून मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आता या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. आरोपी चाटे आणि केदार यांनी आपल्या जबाबात देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नव्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे.

आरोपी चाटे आणि केदार यांनी आपल्या जबाबात फरार कृष्णा आंधळेने सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच ही हत्या केल्याचे कबुल केलं आहे. तर देशमुख यांना धडा शिकवायचा असे सांगण्यात आल्याचे चाटे आणि केदारने आपल्या जबाबात म्हटलं आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Case : '302 मध्ये धनंजय मुंडे सहआरोपी झालेच पाहिजे..', जरांगे आक्रमक

दोघांच्या कबुली जबाबात मात्र खंडणीचा उल्लेख केलेला नसून अपमानाचा बदला असं म्हटलं आहे. यामुळे ही हत्या खंडणीतून झाली की पूर्व वैमनस्यातून यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारने आपल्या कबुली जबाबात सुग्रीव कराडच्या नावाचा उल्लेख केला आहे.

आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या म्हणण्यानुसार सुदर्शन घुलेला सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थानी मारहाण केली होती. यामुळे घुले आणि वाल्मिक अण्णाची बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता. या अपमानाचा बदला घेतल्याचे जबाबात सांगण्यात आले आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, स्कॉर्पिओ वाहनाच्या फॉरेन्सिक रिपोर्टमुळे फास आवळला, धक्कादायक गोष्टी उघड

कोण आहे सुग्रीव कराड?

सुग्रीव कराड हा केज मधील रहिवासी असून तो देखील गुंड आहे. तो याच्याआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्याबरोब काम केलं आहे. लोकसभेपर्यंत खासदार बजरंग सोनवणेंना विरोध केला होता. पण आता सुग्रीव कराड खासदारांचं नेतृत्व मान्य केल्याची चर्चा सुरू आहे. तर सुग्रीव कराड हे राजकीय पटलावरील असून ते पंचायत समितीला आईला निवडून आणले होते. केज नगरपंचायतीच्या वेळी खासदारांच्या मुलीचा पराभव केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com