Santosh Deshmukh Murder Case : नवे सीसीटीव्ही फुटेज समोर; धनंजय देशमुख म्हणाले, मीही संशयाच्या भोवऱ्यात अडकलो!

Walmik Karad Beed Crime News CCTV Footage : वाल्मिक कराड हा 31 डिसेंबरला पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला होता.
Walmik Karad CCTV Footage
Walmik Karad CCTV FootageSarkarnama
Published on
Updated on

Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्याने नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता आरोपींचे नवे सीसीटीव्ही फुजेट समोर आले आहे. आरोपी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येण्यापूर्वी बीडमध्ये होता, असा दावा आता केला जात आहे. त्यावरून आता संतोष देशमुख यांचे बंधू धनजंय देशमुख यांनीही तपासावर संशय व्यक्त केला आहे.

तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. बीडमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हे आरोपी पुण्याच्या दिशेने निघाले. एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये इंधनही भरले, असा दावा केला जात आहे. सीसीटीव्हीमध्ये आरोपींच्या या हालचाली कैद झाले आहे. हे फुटेज 29 डिसेंबरचे असल्याचे सांगितले जात आहे.

Walmik Karad CCTV Footage
Maharashtra Politics : अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा होताच महायुतीने घेतला मोठा निर्णय, नेत्यांना प्रवेश देताना...

पुण्यात आल्यानंतर वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयात गेला आणि पोलिसांना शरण आला. त्यावेळी तो ज्या गाडीतून आला ती गाडी आणि सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली गाडी एकच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कराड पुण्यात पोलिसांना शरण येण्यापूर्वी बीडमध्येच होता, असा दावा आता केला जाऊ लागला आहे.

हे सीसीटीव्ही फुजेट समोर आल्यानंतर धनंजय देशमुख म्हणाले, संशयाच्या भोवऱ्यात मीही अडकलो आहे. मलाही संशय आला आहे. तपास चालू आहे, आरोपींना फाशी होणार, हेही खरं आहे. पण तपासात अतिरिक्त मुद्दे का घेतले जात नाही. आरोपींना फरार करण्यात, आसरा देण्यात ज्यांच्या गाड्या वापरल्या त्यांच्यावर कारवाई का केली नाही. जो माणूस म्हणतोय मी इथे भेटलो तिथे भेटलो, त्याच्याच गाडीत 29 तारखेला नेऊन सोडलेले, स्पष्ट दिसत आहे. त्यावर काहीच काम केलेले नाही. याची मला शंका आहे.

Walmik Karad CCTV Footage
Uday Samant : दावोस दौरा सोडून सामंत मुंबईत; ठाकरेंना देणार सर्वात मोठा धक्का, आमदारांचा आकडा अन् ठिकाणही सांगितलं...

कृष्णा आंधळे आणि टोळीवर 15-15 गुन्हे आहेत. एका पक्षाच्या कार्यालयात कटकारस्थान शिजते आणि माझ्या भावाची हत्या होते. त्यांना अभय दिले नसते तर खून झाला नसता. त्यामुळे याला प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com