Maharashtra Politics : अजित पवार-शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा होताच महायुतीने घेतला मोठा निर्णय, नेत्यांना प्रवेश देताना...

No entry for MVA leaders in Mahayuti राज्यात महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. आता पाच वर्ष कुठलीही संधी नाही. त्यामुळे अनेक जण महायुतीत प्रवेश करण्यास इच्छुक आहे.
Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar
Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Politics : राज्यात महायुतीची सत्ता आल्याने विरोधकांमधील अनेक आमदार आणि कार्यकर्ते सत्तेत सहभागी होणार अशा चर्चा सातत्याने सुरू आहे. त्यात उमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंददारााड चर्चा झाल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चांना उधाण आले आहे. मात्र इन्कमिंगच्या संदर्भात महायुतीच्या तीनही नेत्यांनी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महायुतीच्या विरोधात जे लढले, अपप्रचार केला आणि आता सत्तेचा लाभ घेण्यासाठी येणार असले त्यांना आपसात चर्चा केल्याशिवाय प्रवेश देता येणार नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे महायुतीमधील इन्कमिंगला ब्रेक लावण्यात आला असल्याचे स्पष्ट होते.

Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar
BJP's Action in Sangli : सांगलीत भाजपची कडक कारवाई... माजी आमदारासह माजी जि. प सभापतींची हकालपट्टी

नागपूरमध्ये बावनकुळे यांनी पत्रकारांसोबत चर्चा करताना हा निर्णय फक्त मोठ्या नेत्यांच्या संदर्भात असल्याचे स्पष्ट केले. छोटोमोठे, तालुका पातळीवरचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या प्रवेशाला मनाई करण्यात आली नाही. मात्र ज्या नेत्यामुळे महायुतीला धक्का बसले, बदनामी होईल आणि भविष्यात राजकीय अडचणी निर्माण होऊ शकतील, अशा नेत्यांना भाजप असो वा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला परस्पर निर्णय घेता येणार नाही.

या संदर्भात एखादा निर्णय घ्यायचाच असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपसांत चर्चा करतील आणि त्यानंतर प्रवेश द्यायचा किंवा नाही हे ठरवण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी भाजपसह अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेही इन्कमिंगच्या याद्या आल्या असल्याचा दावा केला.

मविआचे आमदार महायुतीच्या संपर्कात?

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वात सत्ता आहे. राज्यात महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. आता पाच वर्ष कुठलीही संधी नाही. त्यामुळे अनेक जण महायुतीत प्रवेश करण्यास इच्छुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेले आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा वेळोवेळी सुरू असतात. अनेक नेते हा आमच्या संपर्कात तो आमच्या संपर्कात असल्याचे दावेही करत आहेत.

पक्षप्रवेशाच्या अफवा

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा शुक्रवारी मुंबईत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्व अफवा असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय सांगितले हे मला माहीत नाही. शिवसेनेत कोणाला प्रवेश द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे, असे सांगून बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचे आमदार भाजपमध्ये येणार असल्याचे वृत्त फेटाळाले.

Sharad Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar
Uday Samant : दावोस दौरा सोडून सामंत मुंबईत; ठाकरेंना देणार सर्वात मोठा धक्का, आमदारांचा आकडा अन् ठिकाणही सांगितलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com