Maharashtra Live Updates : खळबळजनक! लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात शिरला एक बुरखा घातलेला संशयित व्यक्ती

ZP panchyat samati Elections Voting : 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितांसाठी आज मतदान होत आहे, यासह राज्य आणि देशभरातील घडामोडी एकाच क्लिकवर
Maharashtra Live Updates
Maharashtra Live Updatessarkarnama
Published on
Updated on

खळबळजनक! लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात शिरला एक बुरखा घातलेला संशयित व्यक्ती

लोकल ट्रेनमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात एक बुरखा घातलेला एक संशयित व्यक्ती चढल्यानं प्रचंड गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. संबंधित बुरखा परिधान केलेल्या व्यक्तीनं काही महिलांना स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला.यानंतर महिलांना शंका आल्यानं त्याच्याकडे चौकशी सुरू केली. पण घाटकोपर स्थानक येताच संशयित व्यक्ती चालत्या ट्रेनमधून उडी मारत उलट दिशेनं जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये चढून पसार झाला. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून भीतीचं वातावरण आहे.

पुणे महापालिका महापौर निवड सोमवारी, समित्यांचा फैसला १३ ला

पुणे : पुणे महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक सोमवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य सभगृहात पार पडणार आहे. पण यावेळी स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव कार्यपत्रिकेवर असला तरी तो लांबणीवर पडणार आहे. या सदस्यांची नियुक्ती १३ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील काही दिवसात स्थायी समिती अध्यक्षांसह अन्य समित्यांच्‍या अध्यक्षांची निवडणूक होणार आहे.

बोगस मतदाराला नागरिकांनीच रंगेहात पकडलं, दिला चोप; बनावट मतदारकार्ड असल्याचा दावा  

राज्यातील १२ जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. यामध्ये छत्रपती संभाजी नगरच्या झेडपीचाही समावेश होता. या निवडणुकीत बोगस मतदान करताना एका व्यक्तीला नागरिकांनीच रंगेहात पकडलं आणि त्याला चांगलाच चोप दिला. जालन्याचा रहिवासी असल्याचा तो स्वतः सांगत होता, पण त्यानं छत्रपती संभाजी नगरमध्ये येऊन मतदान केलं. बनावट मतदान कार्डद्वारे या व्यक्तीनं इथं मतदान केल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यातील आघूर इथं हा प्रकार घडला आहे.

ZP Election News : जिल्हा परिषद मतदान टक्केवारी...

सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी साडे सात वाजल्यापासून 3.30 पर्यंत 46.99 टक्के मतदानाची नोंद.

सिंधुदुर्ग- मतदान टक्केवारी सकाळी 7:30 ते 3:30 पर्यंत 50.10 टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 53.43 टक्के मतदान झाले

Dhairysheel Mohite-Patil : मतदार केंद्रावरील प्रशासनाला कडक शब्दात सुनावले

पंढरपूर शहरातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते झेडपी मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत फिरू लागल्याने मतदानाला आलेले शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पोलिसांनी प्रशासनाला कडक शब्दात सुनावले. भाजप कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करीत नसल्याचे पाहून खासदार मोहिते पाटील चांगले संतापल्याचे दिसत होते. त्यानंतर पोलिसांनी शंभर मीटरच्या परिसरात करणाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

पूल नाही तोपर्यंत मतदान नाही! गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात चिकलठाणा जिल्हापरिषद सर्कलमधील बोथ व बोथ तांडा या गावांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. गावाला जाण्यासाठी रस्ता नसणे आणि नदीवर पूल न बांधल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत ईश्वर साक्षीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मावळ तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटात आतापर्यंत 24.45 टक्के मतदान

सकाळी साडेसात ते साडे अकरा वाजेपर्यंतची गटनिहाय मतदानाची आकडेवारी

- टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद गट 8701

- इंदुरी जिल्हा परिषद गट 10252

- खडकाळे जिल्हा परिषद गट 9311

- कुसगाव बुद्रुक जिल्हा परिषद गट 9077

- सोमाटणे जिल्हा परिषद गट 11,640

एकूण दोन लाख 316 मतदारांपैकी आतापर्यंत मावळात 48,981 मतदान

Satara Update : अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट; शशिकांत शिंदे

'जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींना चांगलं यश मिळेल,' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. 'मात्र सत्तारूढ पक्षाने मतदानाची स्टॅटर्जी बदलली आहे. लोकशाही टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत, त्याचा निश्चित फायदा होईल. सत्तेचा दबाव, विकास कामे केली जाणार नाही, असं सुद्धा बोललं जातं, त्यामुळे लोकं खूप दबावाखाली असतात. मात्र लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. अजित पवारांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला. पण त्याचा जाण्याने लोकांमध्ये सहानुभूती आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्चित होईल,' असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले.

Malegaon Mayor Election Update : मालेगावच्या महापौरपदाच्या निवडणुकीत 'इस्लाम'च्या नसरीन बानो शेख यांचा विजय

मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड झाली आहे. नसरीन बानो यांना 43 नगरसेवकांनी मते केली. शिवसेनेच्या लता घोडके यांना केवळ 18 मते पडली असून, त्यांचा 25 मतांनी पराभव केले. इस्लामच्या 35,समाजवादीच्या 5 तर, काँग्रेस 3 तीन, अशा 43 नगरसेवकांनी नसरीन बानो शेख यांच्या बाजूने मतदान केले. AIMIM अन् भाजप नगरसेवक तटस्थ राहिले. महापौरपदासाठी तीन उमेदवारांनी दाखल केले होते.

Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे, तर शिवसेनेकडून उपमहापौरपदी संजय घाडी यांचे नाव निश्चित

मुंबई महापालिकेसाठी भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना युतीने महापौर-उपमहापौरपदासाठी उमेदवार जाहीर केले आहे. भाजपच्या पहिल्या मुंबईच्या महापौर म्हणून रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबईचे शहराध्यक्ष आमदार अमित साटम यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. संजय घाडी हे एकनाथ शिंदे शिवसेनेकडून उपमहापौरपदाचे उमेदवार असणार आहे.

Malegaon Mayor Election : मालेगाव महापौर-उपमहापौरपदावर कोण बसणार? थोड्याच वेळात स्पष्ट होणार

मालेगाव महापौर अन् उपमहापौरपदाच्या निवडीची प्रक्रियेला सुरवात झाली असून, निवडीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. इस्लाम पार्टीचे 35, AIMIM 21,शिवसेनेचे 18, समाजवादी पार्टीचे 5 काँग्रेस 3 आणि भाजपचे 2, असे एकूण सर्व 84 नगरसेवक उपस्थित आहे.

Dharashiv ZP Election : ईव्हीएम मशीनबाबत पुलिंग एजंटना खासदार निंबाळकरांनी दिला मोठा सल्ला

'ईव्हीएमवर निवडणूक लढतोय, त्यामुळे ईव्हीएमवर अविश्वास दाखवला, तर सामान्य मतदारांची भावना काय होईल. ईव्हीएममध्ये घोळ होऊ नये यासाठी तीन गोष्टी कार्यकर्त्यांना करायला सांगितल्या आहेत. पोलिंग एजंटने सकाळी मशीन नीट तपासली पाहिजे. मशीन सील बघितलं पाहिजे. तिथंच मोठा घोळ होऊ शकतो. घोळ होऊ नये यासाठी जे चेक पॉईंट आहेत, ते मतदानापूर्वी तपासले पाहिजे,' असे शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबालकर यांनी म्हटलं आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गोवर्धनवाडी इथं सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

Parbhani Eletion Update : परभणीच्या बोथ अन् बोथ तांडामधील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चिकलठाणा जिल्हा परिषद सर्कलमधील बोथ बोथ तांडा या दोन्ही गावांमध्ये ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावाला रस्ता व नदीवरील पूल नसल्याने हा बहिष्कार टाकला आहे. आमच्या गावातील नदीवरील पूल आणि रस्ता करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी ईश्वर साक्षी शपथ घेत मतदान न करण्याचा निर्धार केला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मतदान केंद्रावर कुणीही मतदानासाठी जाणार नसल्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.

Sangli ZP Update : आमदार जयंत पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ईश्वरपूर नजीक असणाऱ्या साखराळे या त्यांच्या गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. यासाठी ते रांगेत उभे होते. सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगलं यश मिळेल, असा दावा जयंत पाटलांनी केला आहे.

Nitesh Rane : जय श्रीराम बोलणारा महापौर मुंबईकरांनी दिला; नीतेश राणेंची एकेरी भाषेत ठाकरेंवर टीका

'मुंबईकरांनी आपला महापौर अगोदरच निवडला आहे. कोण मुंबईचा विकास करू शकतो हे, माहित असल्याने मुंबईकरांनी कौल दिला आहे. जय श्रीराम बोलणारा महापौर द्या, असे आम्ही सांगितले होते. ते मुंबईकरांनी ऐकलं आहे. तोंडावर आपटण्याची उद्धव ठाकरे यांना सवय, त्यात त्यांनी पीएचडी केली आहे. पुन्हा एकदा तोंडावर आपटेल,' अशी भाजप मंत्री नीतेश राणे यांनी ठाकरेंनी एकेरी भाषेत टीका केली.

Pandharpur Election : उमेदवारानं मुलाकडून ईव्हीएम बटण दाबून बजावला मतदानाचा हक्क; वादाला तोंड फुटलं...

जिल्हा परिषदेच्या उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाना, मतदानावेळी ईव्हीएम मशीन जवळ नेत, यंत्रणाचा बटण दाबून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. अकलूजच्या यशवंतनगर मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. या कृतीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल होण्यास सुरवात झाली असून, यावर वादाला तोंड फुटलं आहे. या धक्कादायक प्रकारावर, निवडणूक आयोग कारवाई करणार का? अशी चर्चा आहे.

बारामतीमध्ये पोटनिवडणुकीची तयारी

पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

मतदानाच्याआधी शरद बुट्टे पाटील यांच्यावर हल्ला

जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या आधीशुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनिता बुट्टे-पाटील यांचे पती शरद बुट्टे पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्वांना शांत केले, बुट्टे पाटील यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती आहे.

नक्षलवाद्यांसोबत चकमक, जवान दीपक चिन्ना मडावी शहीद

माओवाद्यांचा मुकाबला करताना C 60 पथकातील वीर जवान दीपक चिन्ना मडावी हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढून भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या प्रयत्नांची शर्थ सुरू असतानाच त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यानंतर पवार कुटुंबातील सदस्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. अजित पवारांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक आहे.

कोल्हापूरात दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, मतदानाला सुरुवात

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 241 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 455 उमेदवार रिंगणात

सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

कोल्हापूर जिल्ह्यात तालुकास्तरावर विचित्र आघाडी आणि युतीमुळे यंदा निवडणुकीमध्ये चुरस

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठापनाला

तर जिल्ह्यातील महायुतीचे सर्व आमदारांची परीक्षा

ग्रामीण भागातील मतदारांची सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी

भाजप शिवसेना यांची काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात शड्डू

करवीर, कागल, चंदगड, आणि राधानगरी ची निवडणूक बनली नेत्यांच्या प्रतिष्ठेचा विषय

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात

12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. काटेवाटीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार, शर्मिला पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com