राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप एकत्र ; राजकीय समीकरणं बदलणार

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara District Bank) निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि भाजपा (bjp) एकत्र आल्याचे स्पष्ट झालं.
Satara District Bank election
Satara District Bank electionsarkarnama
Published on
Updated on

कराड : कराड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपचे नेत्यांची मैफल जमलेली दिसली. डॉ. सुरेश भोसले, भाजपा नेते डॉ. अतुल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे यशराज पाटील (Yashraj Patil), ऍड. आनंदराव पाटील (Anandrao Patil) ही नेहमी एकमेकाच्या विरोधात असणारी मातब्बर नेते मंडळी मतदान केंद्राबाहेर एकत्र गप्पा मारताना दिसली.

राज्यात सक्षम बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara District Bank) निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि भाजपा (bjp) एकत्र आल्याचे स्पष्ट झालं. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि काँग्रेस नेते उदयसिंह पाटील उमेदवार असणाऱ्या सोसायटी मतदार संघात भाजपने राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी केल्याचं स्पष्ट झालं. या निवडणुकीमुळे कराड तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचे स्पष्ट झाले.

कराड सोसायटी गटातून राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर रिंगणात आहेत. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून आहे. कराड तालुक्यातील कोणता गट कोणत्या उमेदवाराला सहकार्य करणार यावर विजयाचे गणित अवलंबून आहे.

भोसले गटाचे डॉ. सुरेश भोसले, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले हे मतदान करण्यासाठी केंद्रावर आले होते. त्यावेळी ते सहकार मंत्र्यांच्या पेंडॉलमध्येच बसल्याने ते सहकार मंत्र्यांसोबतच असल्याचे स्पष्ट झाले.

Satara District Bank election
हरिपाठाची एक, टोपेंच्या दोन कोविड लस घ्या ; इंदोरीकर महाराजांकडून जनजागृती

पक्षीय पातळीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी विचार विनिमय करून आम्ही कोणाला मतदान करायचे हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या सहकार्यातून काय निष्पन्न होतंय हे लवकरच समजेल, असे स्पष्टीकरण डॉ. अतुल भोसले यांनी केले आहे. कराड सोसायटी मतदारसंघातील केंद्रावर मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com