Nylon Manja Video : अन् मांजाने क्षणात होत्याचं नव्हतं केलं.., मे महिन्यान होतं लग्न त्याआधीच तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Nashik Nylon Manja Accident : मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी वापर केला जाणारा हा मांजा अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.
Nylon Manja Accident
Nylon Manja AccidentSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 15 Jan : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मकर संक्रांतीला पतंग उडविण्यासाठी वापर केला जाणारा हा मांजा अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.

नाशिकमध्ये (Nashik) अशीच एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ज्यामध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा मांजामुळे जागीच मृत्यू झाला आहे. राज्यभरातील विविध मृत्यूच्या घटनांमुळे मांजा विक्रीवर बंदी असतानाही त्याचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर हे पोलिस यंत्रणेचं अपयश असल्याचं सर्वसामान्य नागरिक म्हणत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या पाथर्डी येथील इंदिरानगर भागातून सोनू धोत्रे (Sonu Dhotre) दुचाकीवरून जात असताना पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला अडकला. या मांजामुळे त्याचा गळा चिरला आणि गळ्याची नस कापली गेली. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

Nylon Manja Accident
Delhi Assembly Election : दिल्ली निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन सेट; जाणून घ्या मोदी - शाह किती रॅली करणार!

त्यानंतर सोनू धोत्रेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत मृत्यू झालेल्या सोनू धोत्रेचं मे महिन्यात सोनूचं लग्न होतं. मात्र, त्याआधीच ऐन संक्रातीच्या दिवशी त्याच्या मृत्यूने धोत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हिंगोलीत मांजाने एका मजुराचा गळा कापल्याची घटना समोर आली आहे. शेख शेरू असे या मजुराचे नाव आहे. जखमी झाल्यानंतर मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या गळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या गळावर तब्बल 22 टाके पडल्याची माहिती आहे. सक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा आहे.

Nylon Manja Accident
Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'एसआयटी'चे प्रमुख बसवराज तेलींचं धस 'कनेक्शन'?

मात्र यासाठी केला जाणारा नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर उठत आहे. नायलॉन मांजा गळ्याला कापल्याने नाशिक, नंदुरबार आणि अकोला (Akola) जिल्ह्यात प्रत्येकी एक आसा तिघांचा बळी गेला आहे. नंदुरबारमध्ये 7 वर्षांचा कार्तिक गोरवे या मुलाचा मांजामुळे गळा चिरला. नाशिकमध्ये सोनू आणि विदर्भातील अकोला शहरात दुचाकीस्वार किरण प्रकाश सोनोने याचा मांजामुळे मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com