Teacher Recruitment Scam: शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगावचा आणखी एक मोठा संस्थाचालक अडचणीत; अटकेची टांगती तलवार

Bombay High Court rejects Sharad Shinde's anticipatory bail बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात 160 कोटी रुपयांचा शासकीय अनुदानाचा अपहार झाला आहे. आतापर्यंत यामध्ये 125 आरोपी निष्पन्न झाले आहेत. आहेत.
Shalarth ID Scam SIT investigation
Shalarth ID Scam SIT investigationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Police News: राज्यभर गाजत असलेल्या 160 कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळा तपास पुढे सरकला आहे. या प्रकरणात जळगावचा आणखी एक मोठा संस्थाचालक अडकला आहे. या संस्थाचालकावर न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले.

जळगाव येथील दुसरा संस्थाचालक आणि राजकीय नेत्यांची संबंध असलेल्या शरद दयाराम शिंदे याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे शिंदे याला एसआयटीकडून केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात 2022 ते 2024 या कालावधीत शिंदे यांच्याशी संबंधित संस्थेत 3.66 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियुक्ती देताना त्यांच्याकडून कोरे धनादेश घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या धनादेशांद्वारे शिंदे याने नातेवाईकांच्या खात्यांवर पैसे जमा केले.

गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने शरद शिंदे याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. शिंदे याच्यावर कर्मचारी नियुक्ती आणि बनावट शालार्थ आयडी घोटाळा गैरवापर याबाबत गंभीर ताशेरे ओढले आहेत. शिक्षण उपसंचालक आणि अन्य अधिकाऱ्यांच्या रॅकेटमध्ये शिंदे याचा सहभाग होता.

बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. त्यात 160 कोटी रुपयांचा शासकीय अनुदानाचा अपहार झाला. आतापर्यंत यामध्ये 125 आरोपी निष्पन्न झाले आहेत.

यापूर्वी पालकमंत्री यांच्याशी थेट संबंध असलेले आणि भाजपचे मोठे पदाधिकारी गरुड यांना पोलिसांनी अटक केली आहे. आता जळगाव येथील दुसरा मोठा संस्थाचालक अटक होण्याची चिन्हे आहेत. त्याचाही सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंध असल्याने खळबळ उडाली आहे.

शिंदे याने बनावट शालार्थ आयडी माध्यमातून शिक्षण अधिकारी व उपसंचालक यांच्याशी संगनमत करुन कर्मचारी नियुक्त केले. त्यांच्या नावावर शासकीय अनुदान हडप केले.

Shalarth ID Scam SIT investigation
Teacher Transfer Scam: शिक्षक बदली गैरव्यवहार! 268 शिक्षक, अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; 300 जणांवर कारवाईची टांगती तलवार

शिंदे याच्यावर एसआयटीने नाशिक रोड पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील गुन्हा दाखल करण्याची तयारी केली होती. त्याची चौकशी झाली होती. मात्र त्याने न्यायालयाकडून अटकेपासून हंगामी संरक्षण मिळवले होते. न्यायालयाने हे संरक्षण आता काढून घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com