Teachers EKYC: शिक्षकांसाठी मोठी बातमी! ई-केवायसीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; न केल्यास ऑक्टोबरचा पगार रोखणार!

Shalarth portal e-KYC extension: शालार्थ प्रणालीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसीसाठी ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर मुदतवाढ मिळणार नसून, ई-केवायसी न केल्यास ऑक्टोबरचे वेतन रोखले जाईल.
Shalarth portal e-KYC extension
Shalarth portal e-KYC extensionSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक, उच्च माध्यमिक व प्राथमिक) शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.

आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२६ चे वेतन (जे नोव्हेंबर २०२६ मध्ये दिले जाते) रोखले जाईल, असा स्पष्ट इशारा शिक्षण संचालनालयाने दिला आहे.

वित्त विभागाच्या सूचनांनुसार 'सेवा अर्थ' व 'शालार्थ' प्रणालीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, क्षेत्रीय स्तरावर आढावा घेतला असता हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता दिसून आली. त्यामुळे प्रशासनाने ही मुदत वाढवून ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.

या शाळांतील कर्मचाऱ्यांना लागू

हा नियम खाजगी व्यवस्थापनाच्या अंशतः अनुदानित, पूर्ण अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असेल.

पुढे कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही:

शिक्षण संचालनालयाने पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, ५ ऑक्टोबर २०२६ ही ई-केवायसीसाठीची अंतिम मुदत असून, यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांचे ई-केवायसी मुदतीत पूर्ण होणार नाही, त्यांचे ऑक्टोबर २०२६ चे वेतन नोव्हेंबर महिन्यात आहरित (अदा) केले जाणार नाही. त्यामुळे सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी आणि शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण निरीक्षक आणि वेतन पथक अधीक्षकांना आपापल्या क्षेत्रातील शाळांना याबाबत तात्काळ सूचना देण्याचे आदेश देण्यात आल्या आहेत. महाआयटी (MahaIT) प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com