Sharad Pawar : 'तो' एक प्रश्न आणि शरद पवार पत्रकारांवर संतापले; म्हणाले,'हा काय...'

Sharad Pawar Angrily Reacts : बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या घटनांबाबत देखील शरद पवारांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, त्यांच्या विरोधात सक्त धोरण आखावे.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता.15) मीडियाशी संवाद साधला. राज्यातील कायदा सुव्यवस्थेपासून धार्मिक तणावाच्या घटनांबाबत त्यांनी आपले विचार मांडले. मात्र, पत्रकरांनी विचारलेल्या एका प्रश्नावर शरद पवार संतापले.

जय पवार यांच्या साखरपुड्याबद्दल विचारल्यावर शरद पवार हे पत्रकारांवर चिडले. 10 तारखेला जय पवार यांचा साखर पुढा आहे. तुम्हाला निमंत्रण दिले आहे, असा प्रश्न पत्रकरांनी विचाला असता शरद पवार म्हणाले, 'हा काय प्रश्न आहे. काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा.'

बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या घटनांबाबत देखील शरद पवारांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, जो कोणी कायदा हातात घेतो, वातावरण खराब करतो, त्यांच्या विरोधात सक्त धोरण आखावे. बीडला वैभव प्रयत्न करून देण्याचा करावा. बीड जिल्ह्याला मी अनेक वर्षापासून ओळखतो. आज जी अवस्था आहे. ती कधीच नव्हती.

Sharad Pawar
Manikrao Kokate politics: आश्चर्य, न्यायालयाला चिंता खर्चाची! मंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना वकिलांनी केलेली टिपण्णी चर्चेत

धार्मिक तणावाच्या घटना घडत आहेत त्यावर बोलताना पवार म्हणाले, हे सरसकट राज्यातील वातावरण असं आहे असं मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती काही बिघडली आहे. पण गैरफायदा घेणारे काही घटक आहे. अशांना सामोरे जाण्याचा निकाल राज्य सरकारने घ्यावा. सख्त कारवाई करावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांमध्ये जात आणि धर्म यातील अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी.

दुसरे प्रश्न आहेत की नाही?

मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण आणि हलाल मटण या विषयी वक्तव्य करत मल्हार सर्टिफिकेट आम्ही देणार असून तेथूनच मटण घ्यावे, असे भाष्य केले होते. पत्रकारांनी शरद पवारांना विषयी विचारले असता ते म्हणाले, मल्हार मटण हा हे काय राष्ट्रीय प्रश्न आहेत का? राज्यासमोर दुसरे प्रश्न आहेत की नाही?

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Sharad Pawar
Sharad Pawar on Beed : शरद पवारांचं 'बीड'बाबत मोठं निरीक्षण; राजीनामा दिल्यानंतरही 'टार्गेट'वर पुन्हा एकदा धनंजय मुंडे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com