Big leader joins NCP party : शरद पवारांना मोठा धक्का; तीन टर्म आमदार असलेला बडा नेता घेणार घडयाळ हाती

Senior MLA joins NCP News : गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
Ajit Pawar Shard Pawar
Ajit Pawar Shard PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : तीन टर्म मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक बडा नेता पुन्हा अजित पवारांकडे परत येणार असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या पक्षाला रामराम करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला होता. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात सतीश चव्हाण प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 18 जानेवारीला शिर्डीच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ते प्रवेश करणार आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली होती. ही कारवाई दोन महिन्यात परत घेण्याची वेळ येते की काय? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Ajit Pawar Shard Pawar
Saif Ali Khan attack : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री योगेश कदमांचे मोठे विधान; म्हणाले, 'घटनेमागे अंडरवर्ल्ड टोळी...'

विधानसभा निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी तडकाफडकी कारवाई करत त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यांनतरही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली होती.

Ajit Pawar Shard Pawar
Saif Ali Khan attack : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री योगेश कदमांचे मोठे विधान; म्हणाले, 'घटनेमागे अंडरवर्ल्ड टोळी...'

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या विषयाचा फायदा उचलत भाजपच्या प्रशांत बंब यांना पराभूत करण्याच्या उद्देशाने दोन्ही राष्ट्रवादीने मिळून केलेली ही खेळी त्यावेळी फसली होती. अगदी शरद पवार यांनी सतीश चव्हाण यांच्यासाठी गंगापूरमध्ये येऊन सभा घेत थेट प्रशांत बंब यांच्यावर हल्ला चढवला होता. बंब यांच्या जाहीर सभांमधून पंधरा वर्षात काय केले? असा जाब ठिकठिकाणी विचारला होता. त्यानंतरही येथील निवडणुकीत सतीश चव्हाण पराभूत झाले होते.

Ajit Pawar Shard Pawar
Saif Ali Khan Attacked : 'असा निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री, महाराष्ट्राचे दुर्दैव' ; काँग्रेस नेत्याची खरमरीत टीका

विधानसभा निवडणुकीनंतर महायुती पुन्हा सत्तेत आली होती. त्यानंतर सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते. त्यावेळेस पासून ते अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांच्या प्रवेशाला मुहूर्त मिळाला असून शिर्डी येथे होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनप्रसंगी ते 18 जानेवारीला प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Ajit Pawar Shard Pawar
Narendra Modi : 'स्थानिक'साठी महायुतीत स्वबळाचं टुमकं वाजवणाऱ्यांना PM मोदींचा मोठा झटका; मित्रपक्षांना सांभाळण्याचा का दिला सल्ला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com