Sharad Pawar VS CM Fadnavis : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा, शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, 'त्यांना...'

NCP Merger Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असती तर अजित पवार माझ्याशी बोलले असते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Sharad Pawar VS CM Fadnavis
Sharad Pawar VS CM Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीकरणाची चर्चा सुरू होती. अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चेला ब्रेक लागल्याची स्थिती आहे. दरम्यान, यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विलीकरणाची चर्चा सुरू असती तर अजितदादा मला बोलले असते. मात्र, त्यानी या संदर्भात ते काहीच बोलले नाही.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, 'चर्चेत ते (देवेंद्र फडणवीस) कुठेच नव्हते. त्यांना विलीनीकरणाच्या चर्चेबाबत भाष्य करण्याचा अधिकार काय? हे मला माहीत नाही. '

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्याबाबत बोलताना शपथविधी झाला आनंद आहे. संधी दिली आनंद आहे, असे म्हटले.तसेच शपथविधी करण्यासाठी घाई केली त्यामुळे सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यावर सोशल मीडियात टीका करण्यात येत आहे, याबाबत त्यांना विचारले असता मला त्याच्यावर भाष्य करायचे नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Sharad Pawar VS CM Fadnavis
Ajit Pawar Death: अजितदादांची अखेरची आठवण! बारामतीत सुनेनं काढलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला का?

नरवणेंच्या पुस्तकावर चर्चा...

माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचे काही कोट लोकसभेत वाचून दाखवण्यावरून राहुल गांधी आणि सत्ताधारी पक्षातील नेते भिडले होते. लोकसभेत मोठा गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव घेत गंभीर आरोप केले. दरम्यान, नरवणेंच्या पुस्तकाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले,नरवणेंच्या पुस्तकावर चर्चा करण्याची संधी द्यायला हवी होती. लष्करप्रमुखांनी लिहिलंय याचा अर्थ चिंतेंची स्थिती होती तर चर्चा व्हायला हवी होती.

Sharad Pawar VS CM Fadnavis
BJP Defeated : भाजपचा सपाटून पराभव, महापौरपदी अजीव पाटील; उपमहापौरपदी लोपीस; ठाकूरांचे सोशल इंजिनिअरिंग!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com