Sharad Pawar : माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाश झाले. राऊत यांनी त्यांना अटक केल्यानंतर तुरुंगात आलेल्या अनुभवांवर हे पुस्तक लिहिलेले आहे. पुस्तक प्रकाश कार्यक्रमात शरद पवारांनी ईडी ही जी यंत्रणा आहे, ती कशी वागते? याचं उत्तम लिखाण या पुस्तकामध्ये आहे, असे सांगितले. तसेच आपण केंद्रीय मंत्रिमंडळात असताना ईडीमधल्या दुरुस्तीला विरोध केल्याचा किस्सा सांगितला.
शरद पवार म्हणाले, 'मला आठवतंय केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात त्यावेळी मी होतो. चिदंबरम आमचे सहकारी होते आणि चिदंबरम यांनी कायद्यामध्ये कशी दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे? यासंबंधीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळासमोर आणला. तो वाचल्यानंतर मी डॉ. मनमोहन सिंग यांना सांगितलं की, हे जे प्रस्ताव आहेत ते अत्यंत घातक आहे, हा आपण करता कामा नये.'
'ईडी म्हणते स्वतःहून गुन्हा केला नाही, हे आरोपीने सिद्ध करायचं. त्या संबंधाची तरतूद ही कायद्यामध्ये प्रस्तावित केली. त्याला मी सक्त विरोध केला की, हे करू नका. उद्या राज्य बदललं की, त्याचे परिणाम आपल्याला सुद्धा भोगावे लागतील. पण ते ऐकलं गेलं नाही. राज्य गेलं आणि पहिली ॲक्शन ही चिदंबरम यांच्यावरच घेतली गेली व त्यांना अटक केली गेली. सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला. विशेषतः विरोधकांवर अशा केसेस या अधिक केल्या जातील, ही शंका माझ्यासारख्याला होती.', असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, ईडीने कोणत्या पक्षांवर केसेस केल्या? याची माहिती संजय राऊत यांनी पुस्तकात दिली. एनडीएच्या काळामध्ये 19 जणांवर कारवाई केली होती. यूपीएच्या काळामध्ये 09 लोकांवर आरोप पत्र दिलं, अटक कोणालाही केली गेली नाही. पण एनडीएच्या काळामध्ये काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, द्रमुक, डीएमके, बिजू जनता दल, आरजेडी, बसपा, समाजवादी पार्टी, टीडीपी, आप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, अन्ना द्रमूक, मनसे, टीआरएफ एवढ्या पक्षांच्या नेत्यांवर चौकशी करून केसेस करण्यात आल्या. याचा अर्थ देशातील सबंध विरोधकांना उद्ध्वस्त करायचं. या कायद्याच्या माध्यमातून हा निकाल या ठिकाणी घेतलेला होता. त्याचाच परिणाम अनेकांना त्या ठिकाणी सहन करावा लागला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.