Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीसाठी 'या' दिवशी होणार मतदान; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज

Maharashtra Elections: राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठं विधान केले आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची लगबग सुरु आहे. सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी, महायुतीच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच आता राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या दिवशी मतदान होणार याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.

येत्या काळात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड व जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच निवडणूक आयोगाने वेगळा निर्णय घेतला. आयोगाने आधी हरियाणा व जम्मू काश्मीरची निवडणूक घेतली आणि आता ते महाराष्ट्र व झारखंडची निवडणूक घेणार आहेत. (Sharad Pawar News)

पुढच्या आठवड्यात जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग आपला मोर्चा महाराष्ट्र व झारखंडकडे वळवणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपत असून त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले. त्यामुळे आता लवकरच राज्यातील निवडणुकीचे बिगुल वाजले जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं विधान केले आहे. 8 ते 10 ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील . त्यानंतर 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान मतदान होईल, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. नुकतच केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर निवडणुकांच्या तारखासंदर्भात अंदाज बांधला जात आहे.

Sharad Pawar
MVA News : लातूर जिल्ह्यात जागावाटपावरून 'माविआ'त ठिणगी; ठाकरे गटाने केला 'या' तीन जागेवर दावा

शरद पवार यांनी याबाबतचा अंदाज व्यक्त केला असल्याने आता सर्वांच्या नजरा निवडणुकीच्या घोषणेकडे लागल्या आहेत. येत्या काळात लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
Mahayuti News : उत्तर महाराष्ट्रासाठी महायुतीने आखली रणनीती; 'या' 16 मतदारसंघावर असणार विशेष लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com