Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत दोन दिवस बैठक झाली. जिल्हाध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत पक्षाने पुढील रणनीती ठरवली आहे. पक्षाकडून 2 ऑक्टोबरनंतर राज्यव्यापी दौरे काढण्यात येणार आहे, असे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
एससी,एसटीआणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर राज्यभर आंदोलन उभं करण्याची पक्षाची तयारी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पक्षाकडून जिल्हाध्यक्षांना देखील अल्टिमेटम देण्यात आला आहे.
नव्या जिल्हाध्यक्षांच्या कामाचा तीन महिन्यांत रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार आहे. कामगिरी समाधानकारक नसलेल्या जिल्हाध्यक्षांची पदावरून हकालपट्टी करण्याचा इशाराही देण्यात आल्याचे 'साम'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
रविवारी धाराशिव, नांदेड , लातूर , कोल्हापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, सोलापूर, पुणे, सातारा, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठका पार पडल्या.
बैठकीत जनतेच्या हक्कांसाठी आणि तळागाळातील संघटन मजबूत करण्यासाठी दुष्काळ, शेती, रोजगार आणि स्थानिक पातळीवरील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. बूथ पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत पक्षसंघटना अधिक आक्रमक व सक्षम करण्यावर भर दिला. जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची दिशा निश्चित केली, असे शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.