Sharad Pawar NCP : शरद पवारांचा ‘मास्टरस्ट्रोक’! खांदेपालट करत नव्या नेतृत्वाला संधी; युवक राष्ट्रवादीचा चेहरा बदलला!

Sharad Pawar NCP youth wing News : युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या जागी आता पक्षाकडून नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
Shashikant Shinde, sharad Pawar
Shashikant Shinde, sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनेत महत्त्वाचे फेरबदल करीत भाकरी फिरवली आहे. पक्षात खांदेपालट करत असताना युवकांचा चेहराच बदलला असून त्यांच्या जागी आता नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या जागी आता पक्षाकडून नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवड करीत असताना पक्षाच्या युवक अध्यक्षपदात विभागणी करून एक ग्रामीण आणि एक शहरी युवक अध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षात महत्त्वाचे बदल करीत युवा नेतृत्वाला संधी दिली आहे. विद्यार्थी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी सुशील बोर्डे यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली. तर पक्षाच्या युवक अध्यक्षपदाची विभागणी करून एक ग्रामीण आणि एक शहरी युवक अध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे. युवक शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षपद देताना देखील त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. शहर आणि ग्रामीणसाठी अध्यक्ष निवड करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरच्या युवती प्रदेशाध्यक्षापदी मनाली भिलारे तर ग्रामीणसाठी प्रदेशाध्यक्षा म्हणून अमृता कालदाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवताना आता युवा चेहऱ्याला पसंती दिली आहे.

Shashikant Shinde, sharad Pawar
Mahadev Jankar: महादेव जानकर यांचीही 'Gen Z' ना साद! पक्षाची ताकद वाढवण्यासीठी केली मोठी घोषणा

पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने विशाल वाकडकर यांची युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Shashikant Shinde, sharad Pawar
NCP Sharad Pawar : "गावस्कर अजूनही पॅड बांधून उभे', 'विराट-वैभव' म्हातारे होण्याची वाट पाहणार का?" राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्षांना सवाल

त्यासोबतच यावेळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, छत्रपती संभाजी नगर ग्रामीण कार्याध्यक्ष आशिष पवार, माजी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे, शिक्षक सेल राज्य प्रमुख राम राठोड यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com